Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विविध संघटना, संस्था आणि पक्षातर्फे डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली; मिरवणुका व शिबिरे
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त विविध संघटना, संस्था, पक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अशोक धवड व
राकाँचे पदाधिकारी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक धवड यांनी आरबीआय चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उपस्थित प्रशांत बनसोड,
अजय बहादुरे व डॉक्टर.
रमाई स्मारक बौद्ध मंडळ
रमाई स्मारक बौद्ध विहारच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विठ्ठलराव डांगरे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय नागरिक संघर्ष मंच
भारतीय नागरिक संघर्ष मंचच्यावतीने रिजर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला हार घालून आदरांजली वाहण्यात आली. मंचचे अध्यक्ष राजेश मेश्राम यांनी पुतळ्याला हार घातला. यावेळी मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतील केंद्रीय कार्यालयात अप्पर आयुक्त विष्णुपद बुटे, अतिरिक्त उपायुक्त प्रकाश बोखड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला हार घालून आदरांजली वाहिली. याप्रसंगी अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर, डॉ. अशोक उरकुडे, निगम सचिव हरीश दुबे, कार्यकारी अभियंता जी.डी. जांभूळकर, केशव गजभिये, रवींद्र पागे, नंदकिशोर भोवते, वसंत मुन, मनोहर कोरकर, सहाय्यक आयुक्त राजू भिवगडे, सुनिल मेश्राम आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ओबीसी सेवा संघ
ओबीसी सेवा संघाच्यावतीने शेषनगरमधील कमल कॉन्व्हेंट येथे दिनेश शिरभाते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला हार घातला. यावेळी ओबीसी सेवा संघाच्या सचिव अपर्णा बोरीकर यांनी कमल कॉन्व्हेंटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र भेट दिले.
भारतीय बहुजन विकास परिषद
भारतीय बहुजन विकास परिषदेच्यावतीने परिषदेचे अध्यक्ष अनंता जयपूरकर यांनी रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे
विचारमंचचे कार्यकर्ते.
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे विचार मंच
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे विचार मंचचे संयोजक रामलाल सोमकुंवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिझर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली. यावेळी मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाला अभिवादन करताना जोगेंद्र कवाडे,
जयदीप कवाडे व इतर
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
वर्ण, वर्ग, जातीविहीन शोषणमुक्त एकसंघ भारतीय समाज निर्माण करण्याचा संकल्प करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वानी प्राणपणाने कार्य करावे, असे आवाहन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे, रिपब्लिकन युथ फोर्सचे नेते जयदीप कवाडे, रमाई ब्रिगेडच्या मालती राऊत आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित
अनिस अहमद, जयप्रकाश गुप्ता, कृष्णकुमार पांडे व इतर.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समिती
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीच्यावतीने शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली, रिझर्व बँक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडे उपस्थित होते.
संजय गांधी निराधार मोर्चा
संजय गांधी निराधार मोर्चाचे प्रमुख संयोजक सुशील बालपांडे यांच्या हस्ते व मोर्चाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टिमकी व हंसापुरी येथे गरीब, निराधार, वृद्ध, विधवांना सरबत व अल्पोहारचे वितरण करण्यात आले.
मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवा प्रतिष्ठान
मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवा प्रतिष्ठानच्यावतीने रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रतिष्ठानचे विदर्भ प्रदेश प्रभारी अध्यक्ष भगवान कांबळे यांनी हार घालून आदरांजली वाहिली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
हिवरी नगर मूक-बधिर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र
हिवरी नगर मुक-बधिर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक गुलाब मोटघरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली.
रिपब्लिकन व्हाईस
रिपब्लिकन व्हाईसचे अध्यक्ष असंघ रामटेके यांनी रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अ‍ॅड. देवमन मेश्राम, संजय अडगिणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नागपूर प्रदेश अध्यक्ष अमृत गजभिये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
भारतीय जनता कामगार महासंघ
भारतीय जनता कामगार महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. प्रमोद चिंचखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महामंत्री मारोतराव गोरलेवार, महामंत्री अनिल चौव्हान, भाजपा उपाध्यक्ष कादिर, युवा मोर्चा शहर मंत्री राजेश संगेवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.