Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नागपूर-सिकंदराबाद विशेष गाडी २४ एप्रिलपासून मुंबई-हावडा २६ जूनपर्यंत धावणार
नागपूर, १५ एप्रिल / प्रतिनिधी

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नागपूर-सिकंदराबाद सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. तर हावडा-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ जूनपर्यंत मुदत वाढ

 

देण्यात आली आहे.
(०१३७) नागपूर-सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून सकाळी १०.३५ला निघेल आणि सिकंदराबादला दुपारी ३.३६ वाजता पोहोचेल. ही गाडी सेवाग्रामला सकाळी ११.३४ वाजता, चंद्रपूरला दुपारी १.०५ वाजता, बल्लारपूरला दुपारी १.५० वाजता येईल.
(०१३८)सिकंदराबाद-नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक शनिवारी दुपारी २.३१ वाजता सिकंदराबादहून निघेल आणि नागपूरला रात्री ८.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी बल्लारपूरला दुपारी ४.४० वाजता, चंद्रपूरला ५.०८ वाजता, सेवाग्रामला सायंकाळी १.०३ वाजता येईल. ही साप्ताहिक विशेष गाडी ३० मेपर्यंत राहणार असून एक एसी चेअरकार, नऊ सामान्य चेअर कार डब्यांसह १२ डबे राहणार आहेत.
(०८६०) हावडा-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक बुधवारी दुपारी २.३५ वाजता हावडय़ाहून निघते. नागपूरला प्रत्येक गुरुवारी सकाळी ८.२० वाजता येते. आणि मुंबईला प्रत्येक रात्री ११.३० वाजता पोहोचते. (०८५९) मुंबई-हावाडा सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता मुंबईहून निघते. नागपूरला प्रत्येक शनिवारी दुपारी १.२५ वाजता येते. आणि हावडय़ाला सायंकाळी ७.३० वाजता पोहोचते.