Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

उरुळी ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन स्थगित केल्यानंतर शहरातील कचरा उचलण्याचे काम महापालिकेतर्फे बुधवारी वेगाने सुरू करण्यात आले.

काळे ‘सुवर्ण’
मुकुंद संगोराम
पुण्यातील सुवर्ण सहकारी बँकेला देशातील प्रथम क्रमांकाच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने औषध पाजून सशक्त करण्याचे ठरवले, तेव्हा सुवर्णच्या ठेवीदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी नि:श्वास टाकला. बँक नावाच्या व्यवस्थेवर सामान्य जनतेचा असलेला विश्वास टिकून राहण्यासाठी असे घडणे आवश्यक होते. कधी एकदा हे विलीनीकरण होते, अशी आस लागलेल्या सुवर्णशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना आयओबी हा एक सापळा आहे आणि आपल्याला त्यात पकडून बेदम मारहाण होणार आहे, याची कल्पना नव्हती.

मी ‘शिवाजी’राव बोलतोय..
सकाळी सकाळी फोन खणखणतो.. फोन उचलल्यावर पलीकडून आवाज येतो, मी ‘शिवाजी’राव बोलतोय! पुण्यात नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. विशेषत: त्या चित्रपटातील संवाद विशिष्ट प्रचारकांना भावणारे आहेत. या चित्रपटाची प्रसिद्धी मग लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला भुलविणारी ठरली नाही तरच नवल. पुण्यातील एक उमेदवार सकाळी फोन घेऊन बसतात. पलीकडील व्यक्तीने फोन घेतल्यावर मग संवाद सुरू होतो..‘‘ मी शिवाजी(राव)बोलतोय. तुमचे मत मला मिळालं पाहिजे. तुमचे मत म्हणजे ..

ऑस्कर विजेता रसूल सवंगडी व गुरुजनांना भेटतो तेव्हा..
पुणे, १५ एप्रिल/ प्रतिनिधी

पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूटमधून शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाच्या शिदोरीवर स्वतला जागतिक पातळीवर सिद्ध करणारा ऑस्कर पुरस्कार विजेता रसूल पुकुट्टी आज डोंगराइतके यश मिळाल्यानंतर प्रथमच इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल झाला अन् प्रशिक्षण काळातील आठवणींमध्ये हरवून गेला. त्यावेळचे शिक्षक, सवंगडी व इन्स्टिटय़ूटचा वाहनचालकही त्याच्या यशाच्या आनंदात सहभागी झाले.स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी ‘साऊंड मिक्सिंग’मध्ये ऑक्सर पटकाविल्याच्या पाश्र्वभूमीवर रसूलचा आज इन्स्टिटय़ूटच्या वतीने सत्कार करण्यात आला. इन्स्टिटय़ूटचे संचालक पंकज राग तसेच केदारनाथ आवटी, प्रा. सतीश कुमार आदी प्रमुख त्या वेळी उपस्थित होते. रसूल आज येणार असल्याने सकाळपासूनच इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.

निवडणूक दैनंदिनी
काँग्रेस :
सुरेश कलमाडी यांची जीपयात्रा- वडगावशेरी, सकाळी १०.
महिला मेळावा- द्वारका गार्डन, चंदननगर, दुपारी १२.३०.
मुस्लिम महिला मेळावा, काँग्रेस भवन, सायं. ४.

विद्यापीठात लाचखोरी!
पुणे, १५ एप्रिल/खास प्रतिनिधी

शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळा, एका दिवसात ६२४ उत्तरपत्रिका तपासण्याचा ‘विक्रम’.. यापाठोपाठ पुणे विद्यापीठातील लाचखोरीचे प्रकरण आता चव्हाटय़ावर आले आहे. फर्निचरचे काम केल्यानंतर धनादेश प्राप्त करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली गेल्याची तक्रार एका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.

वेळ मिळाला तर कलमाडींचा प्रचार - अजित पवार
पिपरी, १५ एप्रिल / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरावे लागत असल्यामुळे अजून बारामती मतदारसंघातच जाण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित कालावधीत वेळ मिळालाच तर पुण्यात खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी जाईन, असे विधान पालकमंत्री अजित पवार यांनी आज िपपरीत पत्रकारांशी बोलताना केले.

वेगवान उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांचीही दमछाक उमेदवाराबरोबर एक दिवस
विजय चव्हाण/ नामदेव वालकोळी

सकाळी लवकरच उमेदवार बाहेर पडले. कार्यकर्त्यांचा फारसा फौजफाटा बरोबर नव्हता. जनवाडी भागातील लोकांना भेटी देण्यासाठी त्यांची ती छोटी भेट लवकरच आटोपली आणि नऊच्या सुमारास साहेब घरी परतले, पण घर आणि उमेदवाराच्या हॉटेलसमोर कोणी कार्यकर्ता दिसेना. या निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण अतिशय शांत होते. तेवढय़ात त्यांच्यासाठी नाश्ता आला. तो घेईपर्यंत सकाळचे दहा वाजले. पांढरा शुभ्र सदरा, काळी पॅन्ट व गळ्यात कमळाचे चिन्ह असलेला पुढारी पंचा असा पोशाख चढवून उमेदवार गाडीत बसले. आता हॉटेल समोर कार्यकर्ते जमले होते.

ही पालिकेची निवडणूक नाही!
डॉ. पद्माकर रा. दुभाषी

खासदार म्हणून निवडून आल्यावर मी पुण्याचा कायापालट घडवून आणतो, असे आश्वासन देत निवडणूक प्रचार करणे अप्रस्तुत आहे. पुण्याबद्दल मतदारांना आस्था असणे व पुण्यातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकारक व्हावे असे वाटणे साहजिक आहे. परंतु त्याचा फायदा घेऊन लोकसभेसाठी निवडून आल्यानंतर लोकसभेचा एक सदस्य म्हणून आपण आपली जबाबदारी कशी पार पाडू हे न सांगणे ही मोठी त्रुटी आहे.

लालकृष्ण अडवाणी यांची उद्या पुण्यात सभा
पुणे, १५ एप्रिल / प्रतिनिधी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांची येत्या शुक्रवारी (१७ एप्रिल) सायंकाळी सात वाजता पुण्यात जाहीरसभा होणार आहे. रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर ही सभा होईल. या सभेच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांचीसुद्धा भाषणे होणार आहेत. अडवाणी यांच्याशिवाय गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे यांच्या सभासुद्धा होणार असून, या नेत्यांच्या वेळा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांनी सांगितले.

तळेगावमध्ये आरोग्य विषयक पथनाटय़ व प्रदर्शन
तळेगाव दाभाडे, १५ एप्रिल/वार्ताहर

जागतिक आरोग्य संघटनेच्या या वर्षीच्या ‘आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सुविधा’ या घोष वाक्यावर आधारित तळेगाव प्रायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीपत्रक प्रदर्शन व पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य कर्नल डॉ. सतीश सोमण, विभागप्रमुख डॉ. वंदना पटनायक, अधीक्षक डॉ. एल. बी. खोतकर, डॉ. डी. व्ही. ढमढेरे इ. मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांची आज वारज्यात सभा
पुणे, १५ एप्रिल / खास प्रतिनिधी

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उद्या, गुरूवारी वारजे येथे सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला अवघे सहा दिवस उरले आहेत. या शेवटच्या टप्प्यात ‘स्टार’ प्रचारकांच्या सभा घेण्याचा उमेदवारांचा कल आहे. सुळे यांच्या प्रचारासाठी पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात वारजे येथे सभा घेणार आहेत. ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचे प्रचार प्रमुख काका चव्हाण यांनी कळविले.

‘आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा’
पुणे, १५ एप्रिल/प्रतिनिधी

आघाडी सरकारने भटक्या विमुक्त-जाती-जमातींच्या विकासासाठी रेणके आयोगाच्या शिफारशी मान्य करून त्यांच्या अंमलबजावणीचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आर.पी.आय.च्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी केले आहे. पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अवधूत म्हणाले की, राज्यात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने या प्रश्नावर प्रकाश टाकलेला नाही तसेच फक्त राष्ट्रवादीच्याच जाहीरनाम्यात याचा उल्लेख करण्यात आला आहे. ते म्हणाले की, देशात फक्त महाराष्ट्रातच या वर्गासाठी आघाडी सरकारच्या कालखंडात स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले आहे. परंतु घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी रेणके आयोग लागू होणे आवश्यक आहे.

पवार यांची उद्या हडपसरला सभा
पुणे, १५ एप्रिल/ प्रतिनिधी
बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांची सभा हडपसर वैभव सिनेमासमोरील सोपल ग्राऊंड येथे १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होईल.

‘आढळराव यांचे डोके ठिकाणावर नाही’
पिपरी, १५ एप्रिल / प्रतिनिधी

दररोज नवनवीन वल्गना करणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडून वैयक्तिक द्वेषापोटी आरोप-प्रत्यारोप होत असून सध्या त्यांचे डोके ठिकाणावर नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पंडित गवळी यांनी केली आहे. भोसरीत राष्ट्रवादीने गुंडगिरी वाढविली असा आरोप करणाऱ्या आढळराव यांच्याविरोधात पोलीस दफ्तरी असणाऱ्या गुन्ह्य़ांचा पाढाच गवळी यांनी वाचला आहे. शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभांमध्ये गवळी यांच्याकडून आढळरावांवर कडाडून हल्ला चढविण्याचे सत्र सुरु आहे. शरद पवार असो किंवा बराक ओबामा, आपणास पराभूत करु शकत नाही, अशी वल्गना करणारे आढळराव वैयक्तिक द्वेषापोटी दिलीप वळसे पाटील यांच्यावर आरोप करीत आहेत. मतदानाची तारीख जवळ आल्याने वाट्टेल ते बरळत सुटल्याची खिल्ली गवळी यांनी उडविली.

न्यूमोनियावर उपाययोजना करण्याचे आवाहन
पुणे, १५ एप्रिल/प्रतिनिधी
न्यूमोनिया हा भारत आणि इतर विकसनशील देशांतील पाच वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा सर्वात घातक रोग असून, तो रोखणे आणि नियंत्रण करणे यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन बालरोगतज्ञांनी आज न्यूमोकोकल डिसिज परिषदेमध्ये केले.
ही परिषद एशियन स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर न्यूमोकोकल डिसिज प्रिव्हेनची भारतीय शाखा आणि इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. पुणे आणि परिसरातील १२५ बालरोगतज्ञांनी या परिषदेत भाग घेतला.२४ महिन्यांपेक्षा कमी वय असलेली अर्भके आणि बालके यांना न्यूमोनियापासून वाचवण्यात न्यूमोकोकल काँजुगेट लस अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.