Leading International Marathi News Daily
गुरुवार । १६ एप्रिल २००९

जाऊ या, जाऊ का, चालले..

शाल्मली: शर्वरी, अगं काय सांगतेस काय? इतक्या जवळून वाघ बघितलास? कसलं एक्सायटिंग वाटलं असेल नाही? ए शर्वरी, अशा फोनवर गप्पा मारण्यापेक्षा तू घरीच ये ना. तुझे फोटो, शूटिंग सगळं बघू आणि सगळ्या ट्रीपचं वर्णन.. मजा येईल. रविवारीच ये. निवांतपणे. आई, रविवारी शर्वरी येतेय गं.. अरे, विनायकमामा, तू कधी आलास?
विनायक: आपण फोनवर बोलण्यात दंग होतात तेव्हा! रविवारी, कोणाबरोबर गप्पांचा फड रंगवायचाय?
शाल्मली: शर्वरी. माझी मैत्रीण.

 

शरयू: कुठे जाऊन आल्या बाईसाहेब?
शाल्मली: कान्हाला.
विनायक: कान्हा? म्हणजे वाघोबादादांच्या घरी?
शाल्मली: येस. त्यांच्या ग्रुपला इतका मस्त वाघ बघायला मिळाला ना. शर्वरी तर आता सांगताना नुसती उडतच होती.
शरयू: ही शर्वरी एवढी सारखी फिरत असते. जाते तरी कुणाबरोबर?
शाल्मली: अगं, प्रत्येक वेळेस वेगळ्याच ग्रुपबरोबर जाते.
विनायक: अर्थात तशा काय बायका हल्ली एकेकटय़ा खूप फिरतात. म्हणून खास महिलांसाठी ट्रिप्स ऑर्गनाइझ करण्याचं फॅडच आलंय.
शाल्मली: मामा, त्या कोझी टूर्स वेगळ्या आणि शर्वरी जाते ते ट्रेक्स वेगळे. दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही.
शरयू: हे मात्र खरंय हं. शर्वरी जाते ती ठिकाणं, इतकी वेगळी वेगळी असतात ना. कुठून शोधून काढते ही ठिकाणं कुणास ठाऊक?
शाल्मली: कित्येक वेळा तर ती अशा ठिकाणी असते की, तिच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्क होऊ शकत नाही आणि हे ट्रेक्सही डिमांडिंग असतात माहित्ये?
विनायक: पण मग घरचे बरे परवानगी देतात? काळजी नाही वाटत?
शाल्मली: काळजी वाटणारच. पण काळजी वाटते म्हणून जाऊच द्यायचं नाही, असं होत नाही.
शरद: आपल्याकडे पुरुषांनी एकटं जाण्यात कुणालाच काही गैर वाटत नाही. पण बाईनं असं काही करायचं ठरवलं तर घरचे आणि दारचे तिच्यावर इतके दबाव आणतात की बस!
शाल्मली: पण शर्वरीचं तसं नाहीय. ती वेगळ्याच मुशीतून घडली आहे. सुरुवातीपासूनच तिनं परवानगी वगैरे घेण्याचा प्रश्नच ठेवला नाहीय.
शरयू: तू आता हा परवानगीचा विषय काढलास ना म्हणून सांगते. आपल्या कमलआजींचा ‘जाऊ या, जाऊ का, चालले’ या त्रिसूत्रीवर फार विश्वास होता.
शरद/शाल्मली: जाऊ या, जाऊ का, चालले.. २४ल्ल२ि ्रल्ल३ी१ी२३्रल्लॠ. पण म्हणजे काय?
शरयू: सांगते. त्या म्हणायच्या, लग्नानंतर सुरुवातीची वर्ष बाईनं नेहमी ‘जाऊ या’ म्हणायचं. म्हणजे नवऱ्याबरोबर बाहेर पडायचं. संसारात जरा मुरलं की मग ‘जाऊ का’ विचारायचं. म्हणजे जायचं एकटीनं, पण परवानगी घेऊन आणि केस पांढरे झाले, नातं व्यवस्थित झालं की, मग येते ‘चालले’ची पाळी.
विनायक: हो, पण शर्वरीबाईंनी पहिल्या दोन स्टेप्स गाळूनच टाकल्या ना डायरेक्ट. आता घरातली बाईच असं वागते म्हटल्यानंतर घरातल्या मुलांवर तसेच संस्कार होणार. मग उद्या ती मुलंही तसंच वागली तर दोष कुणाचा?
शाल्मली: मामा, इतका काही सुतावरून स्वर्ग गाठायला नको हं?! तुम्ही पुरुष कसे ‘उद्या आम्ही पिकनिकला जाणार’ असं सांगून मोकळे होता. तेव्हा बायकोची परवानगी घेतलेली असते का?
विनायक: अच्छा, म्हणजे आम्ही पुरुष असे वागतो, म्हणून तुम्हा बायकांना असं वागावंसं वाटतं.. म्हणजे स्त्री-पुरुष समानता वगैरे..
शाल्मली: छे! छे! कसली स्त्री-पुरुष समानता? शर्वरी जाते तर तिला इतक्या गोष्टींची सोय लावून जावं लागतं की बस! कधी कधी तर वैतागून जाते.. अक्षरश: म्हणते, त्यापेक्षा जाऊच नये असं वाटतं.
विनायक: मलाही तेच म्हणायचं होतं. असं सगळ्या कुटुंबीयांना मागं सोडून एकटीनंच मजा मारणं, कसं काय जमतं बायकांना?
शाल्मली: मामा, तू कसा अगदी टिपिकल बायकांसारखं बोललास. काही बायका तिला नावं ठेवायची एकही संधी सोडत नाहीत.
शरद: अगं, तो कोल्ह्य़ाला द्राक्षं आंबट, असा प्रकार असेल. आपल्याला एकटं जाता येत नाही किंवा एकटं जाण्याची धमक नाही, घरून परवानगी मिळत नाही, म्हणून तिच्यावर ताशेरे ओढायचे.
शाल्मली: करेक्ट. पण शर्वरी अशा तशांना भीक घालणारी नाहीय. ती म्हणते. इतकी वर्ष प्रायॉरिटीज वेगळ्या होत्या. आता जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. तेव्हा मला माझ्या मनाप्रमाणे जगू देत..
शंतनू: इती शर्वरी ना?
विनायक: अरे, शंतनू, तू कधी आलास? आणि नुसत्या वाक्यांवरून ओळखलंस? भलतीच पॉप्युलर दिसत्येय ही शर्वरी.
शरद: शर्वरी म्हणजे उत्साहाचं कारंजं आहे मामा. ४ े४२३ ेी३ ३ँ्र२ ु’ िंल्ल िुीं४३्रऋ४’ ’ं८ि!
विनायक: अरे वा, शरदराव, तुम्ही पण..?
शरद: म्हणजे काय! तिचं पाणी वेगळंच आहे, हे तिच्याकडे बघूनच जाणवतं. शर्वरी आणि शेखर म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर कपल आहे.
शरयू: हो नं! दोघं एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाहीत..
शाल्मली: दोघांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे आणि ’्र५ी ंल्ल ि’ी३ ’्र५ी हे जीवनाचं सूत्र आहे.
शंतनू: शर्वरीनं एकटं फिरण्याचं ठरवल्यानंतर शेखरनं डिजिटल कॅमेरा, हँडीकॅम, दुर्बिण सगळं घेऊन दिलं तिला आणि म्हणाला, मस्त फिर..
शरयू: त्या दिवशी शर्वरीनं जमलेल्या सगळ्यांना हे सांगितलं तेव्हा सगळ्या पुरुषांचे चेहरे अगदी बघण्याजोगे झाले होते हं विनायक..
शरद: .. आणि तिथं जमलेले सगळे पुरुष ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’ शर्वरीचं कौतुक करत होते, तेव्हा सगळ्या बायकांची अवस्था ‘दिल जलता है’ अशी झाली होती..
शाल्मली: इतर बायकांचं मला माहिती नाही. पण मला मात्र आयुष्यात अशा वेगळ्या वाटेनं, वेगळ्या विचारांनी चालणाऱ्या बायकांचं कौतुक वाटतं. रुळलेल्या आणि मळलेल्या गुळगुळीत वाटांवरून चालण्यापेक्षा या खाचखळग्यांच्या काटय़ाकुटय़ांच्या वाटा अवघड असतात, पण आव्हानात्मक असतात. या वाटांवरून चालण्यात एक प्रकारचं थ्रील असतं. धुंदी असते. एक वेगळंच समाधान असतं.
शंतनू: शाल्मली, जागतिक महिला दिन होऊन गेला..
शाल्मली: म्हणून काय झालं? अशा महिलांचा सत्कार करायला एकच दिवस कशाला? ही आमची श्रद्धास्थानं आहेत आणि त्यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात ३६५ दिवस ताजा असतो. त्याच आम्हाला बळ देतात. आकाशात भरारण्यासाठी..
shubhadey@gmail.com