Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ एप्रिल २००९

कुछ तेज कदम राहे..
‘इस रास्ते पर सालों से चल रहा हूं.. रायपूर से मुंबई आने में सबसे परेशानी यहीं पर होती है.. मगर आज तो यहाँ एकदम मजा आ गया, मजा..’ कंटेनरचालक परगतसिंग यांचे हे उद्गार म्हणजे कसारा घाटातून नेहमी प्रवास करावा लागणाऱ्यांची प्रातिनिधीक प्रतिक्रियाच म्हणायला हवी. नाशिक-मुंबई प्रवासात सर्वात त्रासदायक टप्पा म्हणजे कसारा घाट. खरे तर सततची वाहतूक कोंडी हीच या घाटाची ओळख. पण, नाशिक-मुंबई रस्ता चौपदरीकरणांतर्गत या घाटात बनविलेला नवा प्रशस्त रस्ता आता वाहतुकीस खुला झाल्याने कसारा घाटाची ही दुष्कीर्ती तर लोपणार आहेच, शिवाय निर्वेध आणि निर्धोक प्रवासाचा आनंदही मिळणार आहे.

आफ्रिकन कुरूक्षेत्रावर
केप टाऊन, १७ एप्रिल / पीटीआय

३७ दिवस.. ५९ सामने.. आठ दिग्गज संघ.. बॉलिवूडमधील तारे-तारका, उद्योगपती मालक-परिवाराची जंत्री आणि अनेक रथी-महारथी क्रिकेटपटूंसह चौकार-षटकारांच्या चौफेर आतिषबाजीला प्रोत्साहन देणारे क्रेझी क्रिकेट फॅन आणि चिअर अप करणाऱ्या मादक चिअर गर्ल या साऱ्यांची रेलचेल उद्यापासून आफ्रिकन कुरूक्षेत्रावर सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वानिमित्त सर्वाना ‘युद्ध अमुचे सुरू’चीच अनुभूती देईल.

जीवघेणी शिक्षा
इंग्रजी येत नसल्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेच्या
कठोर शिक्षेने घेतला चिमुकल्या शानूचा बळी!

नवी दिल्ली, १७ एप्रिल/खास प्रतिनिधी

इंग्रजी येत नसल्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने भर उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिल्यामुळे अत्यवस्थ होऊन बेशुद्धावस्थेत पोहोचलेली ११ वर्षीय शानू खान पुन्हा शुद्धीवर आलीच नाही. लोकनायक जयप्रकाश इस्पितळात गेल्या चोवीस तासापासून सुरु असलेली शानूची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि तिच्या निधनाचे वृत्त ऐकून दिल्लीकर हळहळले. शानूला अघोरी शिक्षा देणारी शिक्षिका तिच्या निधनानंतर फरार झाली असून तिच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

कसाबचे घूमजाव!
पोलिसांनी मारहाण करून कबुलीजबाब घेतल्याचा दावा

मुंबई, १७ एप्रिल / प्रतिनिधी

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल अमीर कसाब याने दिलेला सीलबंद कबुलीजबाब आज न्यायालयात उघड करण्यात आला. अंदाधुंद गोळीबार करून अनेक निरपराध नागरिकांना ठार केल्याचे या कबुलीजबाबात कसाबने स्पष्ट केले आहे. मात्र हा कबुलीजबाब पोलिसांनी जबरदस्तीने आणि मारहाण करून घेतल्याचा दावा करीत कसाबने घूमजाव केले. या खटल्याच्या सुनावणीस आज सकाळी सुरुवात झाली तेव्हा कसाबचे वकील म्हणून अ‍ॅड. अब्बास काझ्मी यांची नियुक्ती करण्यात आली.

यंदा ९६ टक्के पावसाचा अंदाज
पुणे, १७ एप्रिल / खास प्रतिनिधी

मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात देशात या वर्षी ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे व्यक्त करण्यात आला असून, हा अंदाज खरा ठरला तर सरासरी इतक्या पावसाचे हे सलग पाचवे वर्ष ठरणार आहे. हा पहिल्या टप्प्यातील अंदाज असून, जून महिन्याच्या अखेरीस पुन्हा सुधारित अंदाज देण्यात येईल. मान्सूनच्या पावसावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या ‘ला-निना’ या घटकाची स्थिती सध्या सामान्य असल्याने त्याचा पावसावर बरा-वाईट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. देशात मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये (जून ते सप्टेंबर) पडणाऱ्या पावसाची सरासरी ८९० मिलिमीटर आहे. त्याच्या ९६ टक्के पाऊस म्हणजे ८५५.४ मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलीस, अग्निशमन दलाचा
लता मंगेशकर यांच्याकडून विशेष गौरव
मुंबई, १७ एप्रिल / प्रतिनिधी

२६ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाला यंदा मास्टर दीनानाथ मंगेशकर सामााजिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आतापर्यंत असामान्य व्यक्तीला सामाजिक पुरस्काराने गौरविले जात होते. यंदा प्रथमच यंत्रणेचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले. सामाजिक पुरस्काराच्या व्यतिरिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर या स्वत: मुंबई पोलीस व अग्निशमन दलास प्रत्येकी दोन लाख रुपये देणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जावेद अख्तर, चित्तरंजन कोल्हटकर, उस्ताद रशीद खान, परेश रावल दीनानाथ पुरस्काराचे मानकरी
संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल उस्ताद रशीद खान, साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ नाटय़अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर, हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेते परेश रावल हे यंदाच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तसेच २००८ मधील सवरेकृष्ट नाटय़ निमिर्तीचा पुरस्कार चंद्रलेखा संस्थेच्या ‘प्रेमगंध’ या नाटकाला मिळाला आहे. दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष हृदयनाथ मंगेशकर यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मास्टर दीनानाथांच्या ६७ व्या स्मृतिदिनी २४ एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘हृदय संगीत’ हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. ह्रदयनाथ मंगेशकर, देवकी पंडित, हरिहरन, सोनाली राठोड. डॉ. सलिल कुलकर्णी, बेला शेंडे हे सहभागी होणार आहे. मंगेश पाडगावकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ओरिसातील मलकानगिरीचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन भानुदास जावळे सुखरूप
मुंबई, १७ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या मतदानादरम्यान गुरुवारी ओरिसामध्ये नक्षलवाद्यांनी मलकानगिरीचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन भानुदास जावळे यांचे दोन्ही हात बांधून ठेवून निवडणुकीच्या कामासाठी असलेले वाहन व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे जाळली असे प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन असल्याचे डॉ. जावळे यांनी स्वत: आज स्पष्ट केले. आपण सुखरूप असल्याचेही जावळे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लोकसत्ताच्या दि. १७ एप्रिलच्या अंकात तसे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यासंदर्भात डॉ. नितीन भानुदास जावळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्याबाबत नक्षलवाद्यांकडून कोणताही विपरीत प्रकार घडलेला नाही. त्यामुळे आपल्या निकटवर्तीयांनी चिंता करण्याचे कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमानपद गेले
दुबई, १७ एप्रिल / पी. टी. आय.

श्रीलंकन क्रिकेटपटूंवरील लाहोर येथील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानला आज २०११ विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपद गमवावे लागले. त्याचबरोबर पाकिस्तानला सुमारे १ कोटी डॉलर्सवरही पाणी सोडावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कार्यकारी समितीने आज येथे निर्णय घेतला. अतिशय दु:खदायक असा हा निर्णय असून, जड अंत:करणाने तो घ्यावा लागला, असे आयसीसीचे अध्यक्ष डेव्हीड मॉर्गन यांनी सांगितले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी