Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

सामाजिक बांधिलकीचा ‘बी स्कूल’ मार्ग!
मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे ‘सुटेड- बुटेड- टाईड’ विद्यार्थी उद्योग व्यवस्थापनाच्या जाडजूड पुस्तकांना थोडा वेळ बाजूला ठेवून आपलं सामाजिक योगदान देत आहेत. भविष्यातील हे उद्योग व्यवस्थापक आता समाज सुदृढ होण्यासाठी आपला वेळ देत आहेत. वेलिंगकर इन्स्टिटय़ूटतर्फे नुकताच ‘प्रोजेक्ट एसएसआर (प्रोजेक्ट फॉर स्टुडण्टस् सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) सुरू करण्यात आला असून त्याअंतर्गत एमबीएच्या पदव्युत्तर वर्षांचे १८० विद्यार्थी (एमबीए पीजीडीएम) विविध प्रकारचे १२ सामाजिक उपक्रम राबवत आहेत. एखादा गट अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवतोय तर दुसरा गट आपल्याच संस्थेतील लिफ्टमन्स, सुरक्षा रक्षक, सेवक आणि त्यांच्या मुलांना इंग्रजी, संगणक कौशल्य शिकविण्याचा प्रयत्न करतोय तर आणखी कोणी गट थॅलेसेमिक रुग्णांसाठी नियमित रक्तदान शिबिरं राबवतोय

बेरोजगारीपेक्षा काहीतरी काम बरे!
प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपल्या मुलांनी उच्चशिक्षण घ्यावं आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, पण आजकाल उच्चशिक्षण घेतल्यावरही मुलांनी नोकरी मिळणं मुश्कील होऊन बसतं. त्यामुळे चांगलं शिक्षण घेऊनही बेकारांची संख्या वाढत आहे. मुलांना शिक्षण घेतल्यावर चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्येच नोकरी करायला आवडते. हलक्या दर्जाची कामं ते नाकारतात, पण परिस्थितीमुळे किंवा काही कारणांमुळे मुलं आता कुठल्याही क्षेत्रात नोकरी करायला तयार होत आहेत.

दिल से..
प्रिय मिहीर,

हाय! सध्या मी खूप म्हणजे खूपच मजेत आहे. हल्ली मी रोज एका कॅम्पला जाते. तिथे छोटय़ा छोटय़ा मुलांना गाणी, नाच, खेळ काय काय शिकवतो आम्ही. एवढी धमाल येतेय माहितीये?? त्यांची ती न थकता सतत चालू असलेली बडबड, निरागस प्रश्न, छोटय़ा छोटय़ा गोष्टींबद्दल वाटणारं कुतूहल, एकमेकांवरचे लटके रुसवे-फुगवे आणि खदखदून मनमोकळं हसणं.. त्यांच्याशी त्यांच्याच वयाचं होऊन बोलताना, वागताना त्यांचं एक वेगळंच विश्व उलगडतं आपल्यासमोर. भले ते आपल्यासाठी इललॉजिकल असेल, पण निखळ आणि आतून-बाहेरून खरंखुरं असतं रे! त्यांची चिवचिव इतकं फ्रेश करते ना, की हे ‘बालपण असंच राहिलं तर’, असं सतत वाटत राहतं.

‘घुमला हृदयी ‘निनाद’ हा..!’
निनाद मुळावकर, बासरीसारख्या अत्यंत कठीण आणि रसिकमान्य वाद्यावर विलक्षण प्रभुत्व मिळवलेला आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी भारतभरातून, संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी गौरविलेला एक अत्यंत गुणी युवा कलाकार. नुकतीच केंद्र शासनाची अतिशय मानाची शिष्यवृत्ती तसंच सहारा इंडियातर्फे देण्यात येणारा ‘ज्योती पुरस्कार’ निनादला जाहीर झाला. त्यानिमित्ताने निनादशी गप्पा मारताना त्याच्या करिअरविषयी जाणून घेता आले.बासरीवादनाची सुरुवात कशी झाली असं विचारलं असता निनाद हसून म्हणाला, ‘‘खरंतर ११ व्या वर्षांपर्यंत बासरीशी माझा काहीही संबंध नव्हता.

‘कॅम्पस’ म्हटलं की मजा-मस्ती, धमाल ही आलीच. पण हीच तरुणाई वेळ आली की सिरियसही होते. विविध कारणांमुळे यावर्षीच्या निवडणुकांकडे तरुणांचं लक्ष लागून राहिलंय. अतुल कुलकर्णी यांच्या ‘पहिले ते राजकारण’ या ‘लोकसत्ता कॅम्पेन’मधील लेखाने प्रभावित होऊन आम्ही कॅम्पस मूडींनी त्यांची भेट घेऊन ‘आजचे राजकारण व तरुणांचा सहभाग’ या विषयावर चर्चा केली. या भेटीनंतर अतुल कुलकर्णी यांच्याबद्दल कॅम्पस मूड प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया..
अभिनेता असूनही कोणत्याही फॅन्टसीमध्ये न वावरणारा, तसेच सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असणारा प्रॅक्टिकल माणूस ही अतुलची खरी ओळख म्हणता येईल.
प्रशांत ननावरे

फॅशन का जलवा
‘शॉपर्स स्टॉप क्रिसेलीस-२००९’मध्ये प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निक (पीवीपी), एस.एन.डी.टी. वुमन्स युनिव्हर्सिटीच्या पदवीधरांना आपले कौशल्ये दाखविण्याची संधी मिळाली. हे विद्यार्थी पीवीपीमध्ये डिपार्टमेंट ऑफ अपॅरल मॅन्युफॅक्चर अँड डिझाईनमध्ये शिकत आहेत. शॉपर्स स्टॉपमुळे या विद्यार्थ्यांना व्यवसायिक पातळीवरील कपडय़ांचे उत्पादन व विक्रीचा अनुभव मिळाला. शॉपर्स स्टॉपच्या लाइफ, आय-जीन्स वेअर, हॉट करी, आणि इनसेन्स या ब्रँडस्ची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यांना केवळ याच ब्रँडसाठी कपडे डिझाईन करायचे होते व त्यातील सर्वोत्तम कपडय़ांची विक्री शॉपर्स स्टॉपच्या विविध दुकानांतून केली जाणार होती. नरेंद्रकुमार, नचिकेत बर्वे, प्रियदर्शनी राव, निकाश तावडे, केन फर्नाडिस यांसारख्या मान्यवरांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थ्यांनी नवनवीन डिझाईन्स तयार केली. वेंडेल रॉड्रिक्स याच्या फॅशन शोद्वारे अलिशा राऊत, अपर्णा शर्मा, ज्योत्स्ना हर्षिता, प्लेविया व सोनाक्षी सिन्हा या मॉडेल्सनी विद्यार्थ्यांनी तयार केलेली डिझाईन्स सर्वापुढे सादर केली. क्रिसेलीस गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांना डिझाईनिंगबद्दलची सर्वागीण माहिती देत आहे, पण यावर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची अनोखी संधी दिली. शॉपर्स स्टॉपच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. प्रत्येकी दोन असे विद्यार्थ्यांचे पंधरा गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटाला वेगवेगळ्या ब्रँडसाठी डिझाईन करायचे होते. शॉपर्स स्टॉपने या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच सर्वतोपरी मदत केली. हा अनुभव या मुलांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरला. १२ एप्रिलला सादर झालेल्या या फॅशन शोमध्ये अभिनेत्री मलाईका अरोरा खान, रिटा धोडी, सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर विक्रम फडणीस, फॅशन फोटोग्राफर विशेष वर्मा, फॅशन क्रिटीक मेहेर कॅस्टलिनो, लॅक्मे अॅडव्हायजर अनिल चोप्रा, फेमिना एडिटर तान्या चैतन्य व शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट क्रिस्टोफर ब्रम्हॉल हे सर्व नामवंत परीक्षक म्हणून लाभले होते. या कार्यक्रमास शॉपर्स स्टॉपचे ‘सिंपली देसी कलेक्शन’ आणि ‘लाइफ’चे ‘न्यू डेनिम रेंज’ही सादर करण्यात आले. तरुणांच्या प्रतिक्रियांवरून असा निष्कर्ष काढता येईल की हे लाइफ डेनिम्स नक्कीच सरस ठरतील. शॉपर्स स्टॉप-क्रिसेलीस आपल्या या अभिनव उपक्रमाद्वारे नवोदित फॅशन डिझाईनर्सना फॅशनच्या दुनियेत भक्कमपणे आपले पाय रोवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
पूनम बुर्डे
सेंट झेविअर्स
poonamburde@yahoo.co.in

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.