Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठीच रिंगणात..’
४०० ते ५०० वष्रे ज्ञात इतिहास असणाऱ्या आपल्या रायगडमध्ये जमिनींच्या बचावासाठी अनेक लढाया, क्रांत्या, सत्याग्रह झाल़े त्यात माहीत असलेल्या चिरनेरचा सत्याग्रह, चरीचा संप या प्रसिद्ध क्रांत्या होत़ या लढ्यांतून प्राप्त झालेल्या सुपीक जमिनी विनाशकारी प्रकल्पांसाठी वापरण्यात

 

येणार असून त्या जमिनी वाचविण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहोत़
पेणमधील ‘सेझ हटाव’ यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला नाही़ उद्ध्वस्त होणारे कोळी बांधव आणि कोळीवाडे यांचा आवाज दडपण्यात आला़ आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहानुभूतीसाठी मोठमोठे पॅकेज देणाऱ्यांना, जिवंतपणी शेतकरी मरणप्राय यातना भोगत आहेत याचा विसर पडला़ सुपीक जमिनी केवळ संपत्तीसाठी स्वस्तात भांडवलदारांना विकण्याचा डाव आखून संपूर्ण आगरी, कोळी समाज नष्ट करण्याचा जणू विडाच उचलला आह़े सिडको, एमआयडीसी विकास प्रकल्पांच्या नावाखाली नवी मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी स्वस्तात जमिनी घेऊन हजारो आगरी गावे, कोळीवाडे नष्ट करून करोडो रुपयांची मालमत्ता बनवून तुम्हा-आम्हाला देशोधडीला लावल़े पारंपरिक व्यवसाय नष्ट करून आपल्या तरुणांना बेकार केल़े अशा अनेक प्रश्नांनी आगरी-कोळी सारे गांजले आहेत़ हा राग प्रत्येकाच्या मनात आह़े म्हणूनच अलिबागच्या किल्ल्यात गणरायासमोर मावळत्या सूर्याच्या साक्षीने सामूहिक शपथ घेऊन या सरंजामशाही विचारांना मूठमाती देण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतून लढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या घेतला़ सारे शेतकरी-कोळी-आगरी हे सामान्य आहेत, पण एकत्र आलो तर या गर्भश्रीमंत प्रस्थापितांना नक्कीच खाडी व समुद्राच्या खाऱ्या पाण्याची ताकद दाखवू शकतो यात शंकाच नाही़
यासाठीच श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ़ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, विनाशकारी प्रकल्पांपेक्षा शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, श्रमिकांच्या मुक्ततेसाठी, पर्यायी स्वस्त उपाययोजनांची मागणी शासनाकडे करूनही आणि त्यासाठी २००७ साली १८ दिवस, तसेच २००८ साली ४० दिवस ठिय्या आंदोलन व दोन वेळा ५००० जनतेचा अलिबाग ते मुंबई पायी प्रवास, आमरण उपोषण आणि विविध शांततामय आंदोलने असा लढा गेली ४ वष्रे चालू ठेवला़ डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची झोप उडविण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करायला हवा, असे प्रत्येकास नक्कीच वाटत आह़े त्यासाठी मी एक निमित्त आह़े खरं तर ही निवडणूक सारे शेतकरी-आगरी-कोळी लढवित आहेत़ आम्हाला विकास हवा आहे. परंतु विनाश करणारा विकास नको, हे संपूर्ण भारताला-जगाला सांगण्याची योग्य संधी आंदोलनाने यावेळी माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली आह़े
तिचा पुरेपूर फायदा, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, सेझ आणून विस्थापित न होता कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी सामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला विजयी करण्याचा निर्धार संपूर्ण शेतकरी, आगरी, कोळी बांधवांसह रायगडमधील सर्व सुजाण मतदारांनी केला आहे.