Leading International Marathi News Daily
मंगळवार, २१ एप्रिल २००९

टीम लीडर!
प्रतिनिधी / नाशिक

विविध ठिकाणांहून निवडणुकीसंदर्भात होणारी हरतऱ्हेची विचारणा.. दिल्लीतून येणाऱ्या फोनवर करावं लागणारं रिपोर्टीग.. निवडणूक निरीक्षकांच्या शंकाकुशंकांचे निरसन.. कानाचा मोबाईल, समोरचा लॅपटॉप, हातातला पेनड्राईव्ह याद्वारे ‘इफेक्टिव्ह कम्युनिकेशन’चा शक्य तेवढा प्रयत्न.. एकूणातच एरवीपेक्षा किमान दसपटीने वाढलेलं काम.. एवढय़ा सगळ्या व्यापातही स्वत: ‘फ्रस्ट्रेट’ न होता वरिष्ठांचे ‘इगो’ सांभाळत आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावत कामाला गती देणाऱ्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता नरके यांच्याकडे पाहिल्यावर ‘टीम लीडर’ कसा असावा त्याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.

अखेरच्या दिवशी प्रचारफेऱ्यांची चढाओढ
प्रतिनिधी / नाशिक

दिग्गजांच्या प्रचारसभा, अभिनेत्यांचे रोड शो आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी चाललेली धडपड यामुळे लोकसभा निवडणुकीचा उत्तर महाराष्ट्रात शिगेला पोहोचलेला निवडणूक ज्वर प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही कायम रहावा याकरिता राजकीय पक्ष व उमेदवारांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी माकपचा अपवाद वगळता जवळपास सर्वच पक्षांतर्फे प्रचार रॅली काढण्यात येणार असून काँग्रेस आघाडीने तर नाशिक शहरात महारॅलीचे आयोजन केले आहे. या शिवाय, राज ठाकरे यांची संमती मिळाल्यास नाशकात त्यांचा ‘रोड शो’ घेण्याचाही मनसेच्या मंडळींचा मनसुबा आहे.

गर्दीचा गोंधळ अन् गोंधळाची गर्दी!
भाऊसाहेब : आज सांजच्याला तुझ्यावाली गडबड संपनार म्हनायची भावडय़ा..
भावडय़ा : संपणार कशी, वाढणार.
भाऊसाहेब : पन, परचार तर आज संपनार न्हवं?
भावडय़ा : प्रचार संपणार म्हणून काय झालं, दुसरी कामं नाहीत होय ?
भाऊसाहेब : हां, म्हंजे येवडे दिवस साटल्याली समदी कामं पार पाडायची असनार.
भाऊराव : त्याला इतर कामं असतातच कुठे, साठायला ?

‘काही मुद्दय़ांची हमी आवश्यक’
खासदार म्हणून निवडला जाऊ शकणारा उमेदवार सुशिक्षित, सामाजिक कामात काही वर्षे घालविलेला, आपल्या मतदार संघाचे प्रश्न अभ्यासलेला आणि निवड झाल्यानंतर पूर्ण वेळ खासदारकीच्या कामाला वाहून घेण्याची तयारी असणारा असायला हवा. शिवाय त्याने काही बाबींसंबधी मतदारांना हमी द्यायला हवी.अशा काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे : १) ज्या पक्षाच्या तिकीटावर तो निवडला गेला त्या पक्षाचा काही कारणाने त्याग करावासा वाटला तर प्रथम पदाचा राजीनामा द्यायला हवा.

स्वच्छ नदीपात्रासाठी..
प्रश्न जिव्हाळ्याचे;दृष्टी उमेदवारांची

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे ‘प्रश्न जिव्हाळ्याचे’ या मालिकेतून लक्ष वेधण्यात आले. पण, केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, स्थानिक खासदारांकडून याबाबत पाठपुरावा झाला तरच नाशिकच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतो. हे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रस्तुत प्रश्नांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या काही योजना आहेत का, या विषयी जाणून घेतलेली त्यांची मते, त्यांच्याच शब्दात..

..अन् आयुक्तांच्या वाहनावरील ‘अंबर’ दिवा गायब
जळगाव / वार्ताहर

महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणुक आयुक्तांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल होताच त्यांनी आपल्या वाहनावरील ‘अंबर’ दिवा काढून घेतला आहे. महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सोनवणे यांची पात्रता व अधिकार नसतांना ते आपल्या वाहनावर अंबर पिवळा दिवा लावून फिरत असल्याची तक्रार मुख्य निवडणुक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आयुक्तांची लोकसभा निवडणुकीसाठी मीडिया कक्षप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असतांनाही सोनवणे यांनी अनधिकृतरित्या त्या दिव्याचा वापर सुरू ठेवल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचेही तक्रारीतही नमूद करण्यात आले होते. दरम्यान तक्रार दाखल होताच गाडीवरील दिवा काढून घेण्यात आला आहे.

राजाभाऊ सहाणे यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

येथील सार्वजनिक वाचनालयाचे माजी मुख्य ग्रंथपाल रा. शं. तथा राजाभाऊ सहाणे यांचे रविवारी ओतूर येथे निधन झाले. वाचनालयात ५० वर्षे राजाभाऊंनी मुख्य ग्रंथपाल म्हणून काम केले. प्रचंड वाचन, माहितीचा खजिना असलेल्या राजाभाऊंची मराठीतील अनेक साहित्यिकांशी जवळीक निर्माण झाली होती. सेवानिवृत्तनंतरही वाचनालयाच्या सेवेत राजाभाऊंनी योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल वाचनालयाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मो. ग. तपस्वी व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.