Leading International Marathi News Daily
बुधवार, २२ एप्रिल २००९
  पालकांनो, थोडेसेच लक्ष द्या!
  भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
  आर्किटेक्चर, लॉ व हॉटेल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश परीक्षा
  ऑनलाइन टय़ुटरिंग
  एड्स : ‘जर्नालिस्ट टू जर्नालिस्ट प्रोग्राम’
  विजय सातत्याचा
  विश्लेषणात्मक सर्वेक्षण पद्धती
  युनायटेड बँक ऑफ इंडिया लिपिक पदाची तयारी
  अ‍ॅनिमेशनमध्ये आता बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम
  दुबईतील ‘मसाले’दार व्यावसायिक!
  यू.के. व्हिसा मिथ्या आणि सत्य
  संगणक क्षेत्रातील उद्योगाच्या विविध संधी

 

पालकांनो, एक बाब पक्की लक्षात ठेवा की पाल्यांना हे व्यवहारज्ञान शिकवीत असताना त्यांना त्यांचे बालपण पण जगू द्या. त्यामुळे काय होईल तर हीच पाल्ये व्यवहारज्ञान मनापासून गोडीने शिकतील. त्यांना बालपण कसे जगू द्या तर टीव्ही गेम शोचे रिमोट त्यांच्यावर सोपवू नका. त्यांना हिंडू, खेळू द्या. आटय़ापाटय़ा, कबड्डी हे शारीरिक व्यायामाचे खेळ त्याना मुद्दामच खेळू द्या. त्यांना हातपाय मोडण्याचे भय दाखवू नका. सुटीच्या काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला जुजबी म्हणजेच कामापुरत्या प्रारंभिक (बेसिक) गोष्टी शिकविल्या तरी त्या पाल्याला त्याच्या पुढील आयुष्यात कमालीच्या मोलाच्या ठरतात.त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी पण करू द्या. त्याबरोबरच विरंगुळा म्हणून
 

व्यवहारज्ञान पण शिकू द्या. या व्यवहारज्ञानाचा फायदा या पाल्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात निश्चितच चांगला होईल व खास म्हणजे तुमचा पाल्य एक उत्तम नागरिक बनेल.
पालकांनी या चालू सुट्टीत फक्त महिना-दीड महिना एवढाच वेळ आपल्या पाल्याने लहानलहान कामांचा उरका कसा करावा यासाठी द्यावा. यामुळे पुढील आयुष्यात पाल्याला या गोष्टींचा कसा फायदा होतो व त्याची प्रगती कशी उत्तम गतीने होते ते पाहाच.
आता जवळजवळ सर्वच परीक्षा संपत आल्या आहेत. परीक्षा संपल्यावर पाल्यांना एप्रिल महिना संपेपर्यंत हवा तसा आराम करू द्या. त्यांना काहीही उपदेश करू नका. एकदा मे महिना सुरू झाला की साधारण १५ जूनपर्यंत या दीड महिन्याच्या अवधीत मुलांना व्यवहारज्ञान द्या. हा व्यवहारज्ञानाचा डोस दिवसभर चालू ठेवू नका. त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी पण करू द्या. त्याबरोबरच विरंगुळा म्हणून व्यवहारज्ञान पण शिकू द्या. या व्यवहारज्ञानाचा फायदा या पाल्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात निश्चितच चांगला होईल व खास म्हणजे तुमचा पाल्य एक उत्तम नागरिक बनेल. हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांना पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे पाल्यांचा मोकळ्या वेळेचा फायदा पालकांना उठविता येत नाही. पालकांनो, एक बाब पक्की लक्षात ठेवा की पाल्यांना हे व्यवहारज्ञान शिकवीत असताना त्यांना त्यांचे बालपण पण जगू द्या. त्यामुळे काय होईल तर हीच पाल्ये व्यवहारज्ञान मनापासून गोडीने शिकतील. त्यांना बालपण कसे जगू द्या तर टीव्ही गेम शोचे रिमोट त्यांच्यावर सोपवू नका. त्यांना हिंडू, खेळू द्या. आटय़ापाटय़ा, कबड्डी हे शारीरिक व्यायामाचे खेळ त्याना मुद्दामच खेळू द्या. त्यांना हातपाय मोडण्याचे भय दाखवू नका.
सध्याचा काळ हा स्पर्धेचा असल्यामुळे नोकऱ्या मिळणे दिव्य कर्म झाले आहे. मुले पदवीधर होतात. पण ती पोपटपंची अथवा ठराविक पद्धतीने अभ्यास करून पास होतात. काही ठिकाणी नोकरी मिळत नसल्यामुळे पुढील शिक्षण चालू ठेवले जाते. पण तेसुद्धा पुढील पदवी मिळविण्याच्या दृष्टीने. ज्ञान मिळविण्याच्या दृष्टीने नव्हे. नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यावर अनुभव विचारतात. नोकरीशिवाय अनुभव नाही व अनुभव मिळविण्यासाठी नोकरी हवी असे हे विचित्र त्रांगडे आहे. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यासाठी काय करावे म्हणजे आपले पाल्य नोकरी-व्यवसायामध्ये काहीतरी कर्तृत्व नक्कीच दाखवेल यासाठी खालील बाबींकडे लक्ष दिल्यास पाल्याला निश्चितच चांगलेच फायद्याचे ठरेल. म्हणून सुट्टीच्या काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला जुजबी म्हणजेच कामापुरत्या प्रारंभिक (बेसिक) गोष्टी शिकविल्या तरी त्या पाल्याला त्याच्या पुढील आयुष्यात कमालीच्या मोलाच्या ठरतात.
लक्ष देण्याच्या गोष्टी
मित्र-नातलग यांच्यामधील कामापुरता पत्रव्यवहार, पत्रावर व्यवस्थित पद्धतशीरपणे पत्ता लिहिणे म्हणजेच नाव, आडनाव त्यानंतर सदनिका क्र. व इमारतीचे नाव, त्याखाली रस्त्याचे नाव, त्याखाली उपनगर व मुख्य शहराचे नाव टाकून पिनकोड नंबर लिहिणे. पिनकोड नंबर लिहिताना प्रथम तीन आकडे अशा पद्धतीने लिहावा. याशिवाय रजिस्टर्ड पत्र करणे, बँक रोखीची व धनादेशाची स्लिप भरून घेणे, बँकेतून पासबुक-स्टेटमेंट आणणे, रेल्वे रिझर्वेशन फॉर्म भरून घेणे, रेल्वे रिझर्वेशन करून आणणे, आजूबाजूच्या लोकांच्या चर्चेकडे नाक न खुपसता लक्ष देणे, वीजबिलांचा, फोनबिलांचा भरणा करणे, रेल्वेपास काढून आणणे, एकाखाली एक आकडे लिहिणे. त्यामुळे आकडय़ांची बेरीज घेणे सोपे जाते. तसेच कागदाचा मध्य काढून कागद पंच करण्यास शिकविणे. कागद पंच करताना खाली टेबलाचा अथवा सपाटीचा आधार घेणे. कागद हातात धरून चिपळ्याटाईप पंच करू नये. घरी कोणी आल्यावर पंखा लावणे, पाणी देणे, आणखी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हाक मारल्यावर ‘ओ’ देणे व काम ऐकल्यावर ‘हो’ म्हणणे. येथे एक बाब खास नमुन्यादाखल सांगाविशी वाटते की, आमच्याकडे पदवीधर लोक कामाला येतात. एकाला पत्राचा मजकूर सांगितला. तो त्याने कागदावर लिहिला. नंतर त्याला पत्ता लिहिण्यास सांगितले असता त्या हीरोने सदर पत्ता पाकिटावर न लिहिता पोष्टकार्डावर लिहिला. याशिवाय या हीरोला वर उल्लेख केलेल्या कितीतरी बारीकसारीक बाबी येत नव्हत्या ते वेगळेच.
उद्देश काय?
अनुभवासाठी अथवा नोकरीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून येतात तेव्हा त्याना काहीच येत नसते. एक साधी बाब येथे नमूद कराविशी वाटते की आम्ही एखाद्याला हाका मारीत असतो तेव्हा त्याच्या शेजारचा कर्मचारी संबंधित व्यक्ती जागेवर नसल्याचे स्वत:हून सांगत नाही. त्या शेजारच्या कर्मचाऱ्याकडे विचारणा केल्यावर संबंधित व्यक्ती बाहेर अथवा प्रसाधनगृहात गेल्याचे समजते. ही असली प्रारंभिक वळणे मुलांच्या अंगी बाणविणे ही कामे निश्चितच पालकांचीच आहेत. अशा परिस्थितीत भीक नको पण कुत्रा आवर अशी आमची परिस्थिती होते. या अशा जुजबी गोष्टी पाल्याला माहीत नसल्यामुळे त्याची प्रगती खुंटते ही बाब पालकांच्या लक्षातच येत नाही. तसेच दखल म्हणजे इंग्रजी भाषेत ‘कॉग्नीझन्स’ या शब्दाला फारच महत्त्व आहे. म्हणजेच हाक मारल्यावर ‘ओठ म्हणणे व काम सांगितल्यावर ‘ओ’ म्हणणे. याला महत्त्व अशासाठी की संबंधित व्यक्तीने काम ऐकले आहे. काम सांगितल्यावर ‘हो’ म्हणण्याची पद्धत नसली तर ती व्यक्ती काम ऐकले नाही, असे म्हणून काम सांगणाऱ्याची चांगलीच पंचाईत करून ठेवते. तसेच ग्राह्य म्हणजे ‘इम्लाइड’ या शब्दाला पण फार महत्त्व आहे. कोणी ‘पाणी द्या’ म्हटल्यावर पाणी पेल्यांत द्या असे म्हणत नाही. पेल्यात हा शब्द ग्राह्य आहे. केवळ शैक्षणिक पदवीमुळे उन्नती होते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
हल्ली कुटुंब पण मर्यादित असते. त्यामुळे पालकांनी वर उल्लेख केलेली कामे आपल्या पाल्याकडून त्यांच्या कलाकलाने करून घेतल्यास ही पाल्ये त्यांच्या पुढील जीवनात नक्कीच वर येतात. याचे कारण अशी कामे करीत असताना या शिकाऊ पाल्यांना कामाची गोडी निर्माण होते. जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी होण्याची इच्छा असल्यास या मुलांना एक खास कानमंत्र हा द्या की, समोरचा माणूस काय बोलतोय इकडे नीट लक्ष देऊन तसे वागल्यास हवी असलेली कामे भराभर होतात व फुकट जाणाऱ्या वेळेची चांगलीच बचत होते. उदा. टेबलाच्या खणात वस्तू पाहण्यास सांगितल्यावर कपाटांत १० तास बघितली तरी ती वस्तू मिळेल का? तर नाही.
तसेच प्रत्येक वस्तू आपल्याशी बोलते हे लहान मुलांना शिकवा. उदा. चेकबुकात चेकबुक संपत आल्याची ऐक स्लीप असते. ती स्लीप आपल्याला सांगत असते की आता चेकबुकात दोन-तीन चेक्स शिल्लक आहेत. तरी माझ्यावर सही करा व मला बँकेत घेऊन जा व नवीन चेकबुक घेऊन या. दाराच्या बिजाग्रांतून जेव्हा करकर आवाज येत असतो तेव्हा ते दार आपल्याला बिजांग्रात तेल घालून हा कटकटय़ा आवाज बंद करा असे सांगत असते. बघा वस्तू आपल्याशी बोलतात की नाही. पण या नजरेतून बघणारे लोक फारच कमी असतात व जे अशा नजरेतून बघतात ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. तसेच फाजील आत्मविश्वास न ठेवल्यास कामे लवकर होतात. त्यामुळे फुकट जाणारा वेळ, होणारा शारीरिक त्रास, मानसिक त्रास व नुकसान हे सर्वच वाचते. माणसाने वेळेचा उपयोग करावयाचा ठरविल्यास दूरदर्शनवरील मालिका बघताना ज्या जाहिराती येतात त्या वेळी किती तरी लहान लहान कामे उरकता येतात. पण हे कोणाला, तर इच्छा असणाऱ्याला.
तरी खास करून पालकांनी आपले पाल्य शाळा-कॉलेजमध्ये असताना त्याच्या कलानी शाळा-कॉलेजच्या सुट्टीमध्ये लहान लहान कामे करून घेतल्यास पाल्याला कामे करण्याची गोडी निश्चितच उत्पत्न होईल. तरी खास करून मध्यमवर्गीय पालकांनी वरील सर्व बाबींचा विचार केल्यास पाल्याचा पुढील भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल ठरेल. बघा, पालकांनो थोडेसेच लक्ष द्या!
शरद भाटे
संपर्क - ०२२-२५४०६४२४.