Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
व्यापार - उद्योग

फेनेस्टाची राज्यभर विस्ताराची योजना
व्यापार प्रतिनिधी: डीएससीएल उद्योग समूहाची सदस्य आणि देशातील सर्वात मोठी खिडक्यांची निर्माती कंपनी असलेल्या फेनेस्टा बिल्डिंग सिस्टिम्सने देशभरात रिटेल व्यवसायात पदार्पणाची घोषणा केली आहे. ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याच्या कंपनीच्या नव्या धोरणानुसार देशभरात रिटेल शोरूमचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, या धोरणाची अंमलबजावणी मेट्रो आणि मिनी मेट्रो शहरामधील शोरूम्सपासून सुरू होत आहे. रिटेल व्यवसायाच्या विस्तारासाठी मुंबई, नाशिक, लोणावळा, नागपूर, औरंगाबाद आणि अलिबाग यासारख्या शहरांमध्ये डीलरची नियुक्ती केली जात आहे. यापैकी काही शोरूम एक्सक्ल्युझिव्ह पद्धतीच्या असतील आणि त्या ठिकाणी फेनेस्टाची लायडर्स, केसमेण्ट टिल्ट अॅण्ड टर्न, बे आणि कॉम्बिनेशन विण्डोज अशी संपूर्ण मालिका उपलब्ध असेल.

एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
व्यापार प्रतिनिधी:
नुकत्याच संपलेल्या एमसीएचआय प्रॉपर्टी २००९ प्रदर्शनास ७७७५२ लोकांनी भेट दिली. हे प्रदर्शन महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीने ९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित केले होते. यंदा या प्रदर्शनास भेट देणाऱ्यांच्या संख्येत १६.४२ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असून गतवर्षी ऑक्टोबर २००८ मध्ये भरलेल्या प्रदर्शनास ६६७८४ गृहखरेदी इच्छुकांनी भेट दिली होती. एमसीएचआयचे अध्यक्ष प्रवीण दोशी या प्रदर्शनाच्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, प्रदर्शनास मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आम्हाला स्फूर्ती मिळाली आहे. प्रदर्शनाच्या चारही दिवशी पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या उत्सुकतेमुळे मुंबई आणि संपूर्ण राज्यात घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे ग्राहकांना पटल्याचे दिसून येते. एमसीएचआय प्रदर्शनाचे सहनिमंत्रक दीपक गोराडिया याप्रसंगी म्हणाले की, देशाची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबई शहर व उपनगरात घरांची मागणी वाढत असल्याचे प्रॉपर्टी २००९ या प्रदर्शनाने सिद्ध केले आहे. प्रचंड उष्म्याने जीव हैराण होत असतानासुद्धा गृहखरेदीसाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती.’’

टीबीझेडचे ‘लाइट वेट ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन’
व्यापार प्रतिनिधी:
त्रिभुवनदास भीमजी झवेरी अर्थात ‘टीबीझेड- द ओरिजिनल’ या सुवर्णालंकाराच्या पेढीने देशाच्या समृद्ध संस्कृती व परंपरेला अनुसरून यंदा लग्न हंगामासाठी विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांचे खास कलेक्शन प्रस्तुत केले आहे. संकल्पना, रचना, दृश्यरूप असे सर्वागाने नवे असलेले हे वधू-वरासाठी ब्राइडल ज्वेलरी पॅकेज ‘लो कॉस्ट’ही असल्याचे टीबीझेडचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख किरण दीक्षित यांनी सांगितले. या पॅकेजमध्ये बांगडय़ा, ब्रेसलेट, रिंग्ज, नेकलेस आणि कानातल्या कुडय़ा यांचा समावेश असून, हे दागिने सोने, इनॅमल, पर्ल्स आणि रंगीत खडे अशा विविध मिश्रणात उपलब्ध झाले आहेत. टीबीझेड- द ओरिजिनलच्या झवेरी बाजार, बोरिवली, घाटकोपर, सांताक्रुझ आणि ठाणे येथील शोरूम्समध्ये हे नवीन कलेक्शन २० एप्रिल २००९ पासून विक्रीसाठी खुले झाले आहे.

एलआयसी एजंट सतीश परब
‘कोर्ट ऑफ टेबल’चे मानकरी
व्यापार प्रतिनिधी :
व्यापार-उदीम क्षेत्रात चढ-उतार होत असतात. कधी मंदी, कधी संधी यासाठी उद्योजकांनी जागरूक राहावे लागते. स्पर्धा, कर्जबाजारी,अपघात, आपत्ती, गैर व्यवस्थापन, कौटुंबिक मतभेद आदी कारणामुळे व्यापार उद्योग अडचणीत येतात. नुकसान होणे, बंद करणे, विकणे, त्यातून कामगारांची रोजीरोटी जाणे, अशी संभाव्य संकटे टाळण्यासाठी प्रामुख्याने अर्थनियोजनाची निकड असते. ही निकड जाणूनच एलआयसीने काही पॉलिसी योजना आखल्या आहेत. एके काळचे साधे एलआयसी एजंट असलेले सतीश परब आज कोर्ट ऑफ दि टेबल उडळ, टऊफळ (वरअ) चे मानकरी आहेत. भारतातील फार थोडय़ा एजंटना हा सन्मान प्राप्त झालेला आहे. तसेच ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे अधिकृत विमा सल्लागार आहेत. तशा एलआयसीच्या व्यक्तिगत, गृहकर्ज, उद्योगसंबंधीच्या अनेक पॉलिसी योजना आहेत. अशा योजनांच्या आधारेच सतीश परब उद्योजकांच्या हितासाठी, आर्थिक नियोजनाची तरतूद करतात. शिवाय कामगारांच्या हितासाठीही सल्ला देतात. प्रसंगी याचा फायदा उद्योगाचे आधुनिकीकरण, वाढ, बदल यासाठीही होऊ शकतो.

टाटा एआयजीची ‘लाइफ हॉस्पिबॅक’ योजना
व्यापार प्रतिनिधी:
टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारतातील पहिल्या गॅरेंटिड इश्यू अॅण्ड रिटर्न ऑफ प्रीमियम हेल्थ उत्पादनाची सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे उत्पादन भारतात प्रथमच सुरू करण्यात येत असून त्यामुळेआता टाटा एआयजी ही अशा प्रकारे पॉलिसी सुरू करणारी भारतातील पहिली आयुर्विमा कंपनी ठरली आहे. या नवीन उत्पादनाचे नाव ‘टाटा एआयजी लाइफ हॉस्पि कॅश बॅक’ असे असून या योजनेंतर्गत विमाधारकांना अनेक वेळा दावा करता येऊ शकतो. जर विमाधारकाला अचानक काही रुग्णालयाचा खर्च आला तर असा खर्च भरून निघतोच पण त्याचबरोबर त्याने भरलेले हप्तेही परत मिळतात. यामध्ये विमाधारकाला रुग्णालयाचा खर्च एकरकमी दिला जातो. त्यात रुग्णालयाचा खर्च, केअर चार्जेस, अॅम्ब्युलन्स चार्जेस आणि इतर खर्च रुग्णालयात भर्ती झाल्याच्या पहिल्या दिवसापासून दिला जातो. याचबरोबर आपण भरलेले हप्ते परत मिळण्याचीही हमी यामध्ये दिली गेली आहे. जरी आपण अनेक वेळा दावा केला असला तरीही आपणास आपले हप्ते परत मिळतात.