Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

फेनेस्टाची राज्यभर विस्ताराची योजना
व्यापार प्रतिनिधी:
डीएससीएल उद्योग समूहाची सदस्य आणि देशातील सर्वात मोठी खिडक्यांची निर्माती कंपनी असलेल्या फेनेस्टा बिल्डिंग सिस्टिम्सने देशभरात रिटेल व्यवसायात पदार्पणाची घोषणा केली आहे. ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याच्या कंपनीच्या नव्या धोरणानुसार देशभरात रिटेल शोरूमचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, या धोरणाची अंमलबजावणी मेट्रो आणि मिनी मेट्रो शहरामधील शोरूम्सपासून सुरू होत

 

आहे.
रिटेल व्यवसायाच्या विस्तारासाठी मुंबई, नाशिक, लोणावळा, नागपूर, औरंगाबाद आणि अलिबाग यासारख्या शहरांमध्ये डीलरची नियुक्ती केली जात आहे. यापैकी काही शोरूम एक्सक्ल्युझिव्ह पद्धतीच्या असतील आणि त्या ठिकाणी फेनेस्टाची लायडर्स, केसमेण्ट टिल्ट अॅण्ड टर्न, बे आणि कॉम्बिनेशन विण्डोज अशी संपूर्ण मालिका उपलब्ध असेल.
मुंबईत अंधेरी-कुर्ला रस्त्यावर ‘होम टू ऑफिस’ही हाय स्ट्रीट श्रेणीतील अत्याधुनिक शोरूम उघडण्यात आली आहे. खिडक्यांच्या विक्रीसाठी कंपनी शॉप इन शॉप या तंत्राचाही वापर करणार आहे. यासाठी कंपनीने मुंबईतील, आंतरराष्ट्रीय उत्पादनांची विक्री करणाऱ्या सी. भोगीलालसारख्या होम इम्प्रूव्हमेण्ट व्यवसायातील व्यापाऱ्यांशी करार केले आहेत. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या खिडक्यांनी देशभरातील बिल्डर, आर्किटेक्ट, इंटीरिअर डिझायनर, अशा व्यावसायिकांची प्रशंसा मिळविली आहे.
फेनेस्टा बिल्डिंग सिस्टिम्सचे बिझनेस हेड संदीप माथुर म्हणतात, ‘‘घरात सुधारणा करताना खिडक्या बदलण्याची कल्पना सध्या अतिशय लोकप्रिय झाली आहे. कंपनीच्या आता महाराष्ट्र आणि इतर भागांत एक्सक्ल्युझिव्ह शोरूम्स उघडल्यामुळे आम्हाला आमच्या यूपीव्हीसी खिडक्या ग्राहकांपर्यंत नेणे आणखी सोपे झाले आहे.’’ फेनेस्टा खिडक्या देशातील सर्व तऱ्हेचे हवामान लक्षात घेऊन बनविण्यात आल्या आहेत. कोसळणारा पाऊस किंवा वेगाने वाहणारे वारे या दोन्हींना या खिडक्या खंबीरपणे तोंड देत असल्यामुळे उंच इमारतींमध्ये त्यांचा उत्तम उपयोग होतो, असेही ते म्हणाले.
प्रति चौ. फुटाला रु. ४०० ते रु. ७०० या दराने मिळणाऱ्या फेनेस्टा खिडक्या पारंपरिक लाकडी, लोखंडी किंवा अॅल्युमिनियम खिडक्यांपेक्षा अनेक तऱ्हांनी श्रेष्ठ आहेत. यामध्ये आवाज आणि धुळीपासून संरक्षण, हवा खेळती ठेवण्याची क्षमता, टिकाऊपणा, एअर कंडिशनर्सवर ऊर्जेची बचत आणि दुरुस्तीची आवश्यकता न पडणे या वैशिष्टय़ांचा समावेश आहे.