Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

डावखरेंच्या सशामागे परांजपेंचे कासव
भगवान मंडलिक
गेल्या १५-२० वर्षांपासून चघळून चोथा झालेल्या नागरी समस्या, विकासाचे प्रश्न घेऊन कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद परांजपे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन्ही उमेदवार ठाण्याचे राहणारे, त्यामुळे आयात उमेदवार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. स्थानिक उमेदवार म्हणून ‘मनसे’ने वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी दिली आहे.

सेनेचा ढोल.. मनसेचा नगारा..अर्थात राष्ट्रवादीचा गजर!
दिलीप शिंदे

रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांसारख्या बुद्धिजीवी खासदाराचा वारसा नेटाने चालविणाऱ्या शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांनी सेनेचा गड राखला होता. पुन्हा त्यांना ठाण्याची शिलेदारी मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असताना राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसैनिक बनलेल्या नवी मुंबईतील विजय चौगुले यांच्यावर उमेदवारी लादण्यात आली. त्यामुळे विकासाच्या मुद्दय़ाला बगल देत व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपापासून कोर्टबाजीपर्यंतच्या प्रचाराच्या सर्वच टप्प्यात गाजू लागलेल्या ठाणे मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अल्पावधीत चांगले काम केल्याने काँग्रेसला राज्यात लक्षणीय यश मिळेल- मुख्यमंत्री
मुंबई, २२ एप्रिल / खास प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युतीने कितीही विरोधी प्रचार केला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शहरी व ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात काँग्रेस आघाडीला गतवेळच्या तुलनेत चांगले यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त केला. शेवटी सर्वसामान्यांचे प्रश्न काँग्रेस पक्षच सोडवू शकतो यावर राज्यातील जनतेचा विश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्याच्या सर्वच भागात प्रचार केला.

अ‍ॅडव्हाण्टेज भाजप!
स्वानंद विष्णु ओक

आसाममध्ये आज जी परिस्थिती आहे ती जर संपूर्ण देशभर असती तर ‘टीम भाजप’ आज अडवाणींच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला लागली असती! भाजप आणि रालोआच्या दुर्दैवाने देशात तशी परिस्थिती नाही. एकूण चेहेऱ्यामोहऱ्यामुळे मुस्लिम मतदार आपल्या झोळीत मतांच्या राशी ओतणार नाही हे भाजपला पक्के ठाऊक आहे. पण त्याचबरोबर ‘अवघा हिंदू’सुद्धा आपल्यासोबत नाही याचीही जाणीव त्यांना आहे. पण हे झाले तर? या स्वप्नरंजनात मात्र भाजपचे नेते असतात. भाजपचे हे स्पप्न अचानकपणे आसाममध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

बसपा का जोरका झटका.. लगे धीरेसे!
संदीप आचार्य
मुंबई, २२ एप्रिल

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी बसपाने सर्वच्या सर्व म्हणजे ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले असून प्रामुख्याने विदर्भात तसेच पुणे आणि दक्षिण मुंबईत बसपाच्या उमेदवारांमुळे प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा जीव टांगणीवर लागला असून गडचिरोली या एकमेव मतदारसंघात बसपाला चमत्काराची आशा आहे. विदर्भात बसपाच्या झटक्याचा फायदा प्रामुख्याने सेना-भाजपलाच अधिक होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

वरुण गांधीही कोटय़धीश
पिलिभीत, २२ एप्रिल / पी.टी.आय.

चिथावणी देणारे भाषण दिल्यामुळे रासुका लावण्यात आलेले भाजपचे तरुण उमेदवार वरुण गांधी यांनी आज पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वरुण गांधी यांची दोन आठवडय़ांसाठी जामिनावर सुटका करण्यात आली असल्याने त्यांच्या समर्थकांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मोजक्याच लोकांसह वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपा हा थापाडय़ांचा पक्ष
मुंबई, २२ एप्रिल/ खास प्रतिनिधी

दहावीची परीक्षा संपल्यानंतर जशी मुले ‘सुटतात’ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ४८ खासदार येथून दिल्लीला गेले की, अक्षरश: उंडारत असतात. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी काहीही देणेघेणे नसल्यासारखे यांचे दिल्लीतील वर्तन असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी हा हरामखोरांचा पक्ष आहे तर भाजप हा थापाडय़ांचा पक्ष असल्याचे सांगत राज यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

मुंबईच्या समस्यांचे ‘पोस्टमॉर्टेम’ करणारी श्वेतपत्रिका जारी
बलात्कार, खुनाच्या घटनांमध्ये वाढ; नागरी समस्येकडे पालिकेचेच दुर्लक्ष
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी
लोकांच्या दैनंदिन नागरी समस्यांकडे पालिकेचेच संपूर्ण दुर्लक्ष असते वा मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात बलात्कार, खून, दरोडे, घरफोडय़ांच्या घटना वाढल्या आहेत, असे स्पष्ट करणारी दुसरी श्वेतपत्रिका ‘प्रजा डॉट ऑर्ग’ या समाजसेवी संस्थेने आज जारी केली. लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही श्वेतपत्रिका जारी करण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक विश्वस्त निताई मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमोदजी हे वाजपेयी समर्थक असल्यानेच पूनमला तिकीट नाकारले
प्रकाश महाजन यांचा आरोप
बदलापूर, २२ /वार्ताहर
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप यांच्यात युती झाली नसून, शिवसेना- राष्ट्रवादी यांची छुपी युती झाली असल्याचे वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे यांच्या लढतीवरून सिद्ध होते, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामागे दिवंगत प्रमोद महाजन खंबीरपणे उभे ठाकले होते. याच द्वेषापोटी पूनम महाजन यांना भाजपने उमेदवारी नाकारली, असा आरोप करून भाजप हा आता परिवार राहिला नसून, एकमेकांवर पलटवार करणारा पक्ष झाल्याचे महाजन म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटींच्या
बनावट नोटांचा सुळसुळाट!
संदीप प्रधान
मुंबई, २२ एप्रिल

लोकसभा निवडणुकीत पैशांचा होणारा अर्निबध वापर डोळ्यासमोर ठेवून किमान एक हजार कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न देशविघातक शक्तींनी सुरू केल्याचा दावा पोलीस दलातील व डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स (डीआरआय)मधील अधिकारी करीत आहेत.
निवडणूक काळात पैशाची मागणी वाढत असल्याने याच काळात बनावट नोटा चलनात घुसविण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईत दोन दिवसांपूर्वी गांजाचा साठा सापडला.

रिपाइं ऐक्यवादीची शिवसेनेशी फारकत
ठाणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असताना शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या रिपाइं ऐक्यवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजीव नाईक यांना पाठिंबा दिल्याची घोषणा आज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गंगाराम इंदिसे यांनी ठाण्यात केली.

सर सर झाडावर; झर झर खाली!
आठवणीतील लढती
अनिल पं. कुळकर्णी
‘आमच्या मतदारसंघात एक व्यक्ती मग ती कोणत्याही पक्षाची असो; सलग दोनवेळा कधीही निवडून येत नाही. आजवरचा हा ‘रेकॉर्ड’ आहे,’ असे मुंबईच्या दादर लोकसभा मतदारसंघातील (उत्तर मध्य मुंबई) मतदार असलेला आमच्या कार्यालयातील एक सहकारी चर्चेदरम्यान सांगत होता. मला चांगलं आठवतं.. गुरुवार २२ एप्रिल २००४ ची गोष्ट आहे ही! ..तर दुसरा सहकारी ‘सर सर किल्ला सर’ अशा शीर्षकाने मनोहर जोशी यांच्या विजयाची खात्री देणारे वार्तापत्र लिहून मोकळा झाला होता..! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात उत्तरमध्य मुंबईमध्ये लढत होती.

सेना नेत्यांच्या कुंडल्या बाहेर काढणार- राणे
रत्नागिरी, २२ एप्रिल/खास प्रतिनिधी

शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून माझ्यावर बेताल टीका केली जात असून, लोकसभा निवडणुकीनंतर या नेत्यांच्या कुंडल्या मी बाहेर काढणार आहे, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिला. राणे म्हणाले, ‘मातोश्री’वरून चालणाऱ्या कट-कारस्थानांची माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण सध्या मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. उद्या निवडणूक झाल्यानंतर मी याबद्दल सविस्तर बोलणार असून, ‘कारस्थान सम्राटां’च्या कुंडल्या बाहेर काढणार आहे.