Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

‘अखंड पदयात्रा..’
बाळा नांदगावकर (मनसे) -

पहाटे साडेसहाच्या सुमारास बाळा नांदगावकर आपल्या नित्यक्रमानुसार जॉिगगला बाहेर पडले. धावत धावतच ते रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना हात दाखवून नमस्कार करीत होते. काही व्यक्तींशी संवाद साधत मलाच मतदान करा, अशीही विनवणी ते करीत होते. खरेतर, रात्री तीन वाजता झोपी गेल्यानंतर पहाटे लवकर उठून पुन्हा कामाला लागणे म्हणजे कठीणच आहे. मात्र निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याने प्रत्येक उमेदवाराला प्रचंड कष्ट उपसावे लागत आहेत. अशावेळी मग नांदगावकर तरी कसे मागे राहणार ?

‘येऊन येऊन येणार कोण?’
मोहन रावले (शिवसेना) -

मंगळवारी संध्याकाळी साधारण साडेसहाची वेळ.. कफ परेड पोलीस ठाण्याजवळच्या संक्रमण शिबिरात शिवसैनिकांची धावपळ सुरू होती.. भगवे झेंडे, निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते ते उमेदवाराच्या आगमनाकडे.. अन् अचानक ‘मोहन रावले आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं..’ या घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला. दक्षिण मुंबईमधून शिवसेनेतर्फे लोकसभेची निवडणूक लढवित असलेले उमेदवार मोहन रावले यांचे आगमन झाले.

‘सारे काही प्रचारासाठी..’
मिलिंद देवरा (काँग्रेस) -

साधारणत: तीनच्या सुमारास चर्चगेट येथील खेतान भवनमधील आपल्या कार्यालयात मिलिंद देवरा बसले होते. चार वाजता सी. पी. टँकपासून सुरू होणारया पदयात्रेसाठी त्यांना रवाना व्हायचे होते. या मधल्या वेळेतही त्यांना उसंत घ्यायला वेळ नव्हता. कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यापासून पत्रकारांपर्यंत बरेचजण त्यांना भेटण्यासाठी आले होते. इमारतीच्या खाली मात्र कार्यकर्ते वाट पाहात उभे होते. पावणेचारच्या सुमारास देवरा यांनी प्रचाराला निघण्याची तयारी केली.

अतुल कुलकर्णी आज साठय़े आणि एमईटी महाविद्यालयात
साठय़े महाविद्यालयातील कार्यक्रम सर्वासाठी खुला

लोकसत्ता कॅम्पेन
प्रतिनिधी

‘पहिले ते राजकारण’ या अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लोकसत्ता रविवार वृत्तान्तमध्ये लिहिलेल्या प्रकट चिंतनात्मक लेखावर लोकशाही अधिक सुदृढ करण्यासंदर्भात व्यक्त झालेल्या विविध प्रतिक्रियांनंतर आता या विचारधारेने एका चळवळीचे रूप धारण केले आहे. यासंदर्भात केवळ चर्चा न करता त्याला ठोस व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एक विशेष कॅम्पेन मुंबई-ठाणे परिसरातील निवडक महाविद्यालयांमध्ये हाती घेतली आहे. त्याची सुरुवात गुरूवार, २३ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात होणार असून इथे सकाळी ११ वाजता ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते अतुल कुलकर्णी तरूण-तरूणींशी थेट संवाद साधणार आहेत.

बळी तो कान पिळी..
ते साल होतं १८५८.. डार्विन जरी शरीराने इंग्लंडमध्ये होता तरी त्याचे उद्विग्न मन मात्र भरकटत होते दूर.. दूर.. दूरवरील निळ्याशार प्रशांत महासागरातील बेटांवर.. तिथल्या काळ्या तप्त खडकाळ भूमीवर लाटेमागून लाट फुटत होती.. त्या काळ्या कुळकुळीत खडकांवर होते चित्रविचित्र आकाराचे वळवळणारे भयंकर अजस्र सरडे.. मोठाल्या पाली.. आपली निमुळती मान लांब- लांबवून निवडुंगाची काटेरी खोडं चघळणारी राक्षसी कासवं आणि चिवचिवाट करणारे छोटे- छोटे असंख्य चित्रविचित्र पक्षी.. अन् इथल्या आसमंतात रापण जाळल्यावर येतो ना तसा उग्र दर्प दाटलेला.. अशी ती काळी भूमी.. तिथली अद्भुत गुढे..

बदलाची कळ प्रवाशांच्या हाती
‘रोज मरे त्याला कोण रडे..'मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेचे वर्णन करण्यासाठी एकेकाळी ही म्हण अतिशय समर्पक होती. कोणत्या ना कोणत्या कारणाने मध्य रेल्वेची उपनगरी सेवा सर्रास विस्कळीत व्हायची. अनेकदा रेल्वेमार्गातून ठेचकाळत मार्ग काढण्याची वेळ प्रवाशांवर येत असे. रेल्वे स्थानकांत सोयीसुविधांची वानवा आणि स्वच्छतेच्या नावानेही आनंदी-आनंद असायचा. गेल्या काही वर्षांत मात्र हळूहळू या परिस्थितीत सुधारणा होत आहे. उपनगरी वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण घटले आहे.

शाळेची वेळ बदलल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
प्रतिनिधी

गेली ७५ वर्षे गोरगरीबांच्या घरातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या गावदेवी येथील सेवासदन सोसायटीच्या प्राथमिक शाळेची वेळ पालकांना कोणतीही कल्पना न देताच जूनपासून अचानक बदलण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतल्यामुळे पालकवर्ग संतप्त झाला आहे. संस्थाचालकांच्या या निर्णयाला पालकवर्गाकडून कडाडून विरोध केला जात असून या विरोधात त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. गावदेवी, नानाचौक, गवालिया टँक, बाबुलनाथ, वाळकेश्वर या परिसरातील गरीब घरच्या अनेक मुली सेवासदन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत या शाळेची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४.४५ अशी होती. मात्र येत्या जून महिन्यापासून शाळेची वेळ ९.३० ते दुपारी २.३० अशी करण्याचा एकतर्फी निर्णय संस्थेच्या अध्यक्षांनी घेतला. या शाळेतील मुलींचे पालक फळ, भाजी, दुध विक्री अशा प्रकारचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच टॅक्सीचालक, घरकाम करणाऱ्यांच्या मुलीही या शाळेत शिक्षण घेत आहेत. काही मुली आपल्या पालकांना त्यांच्या कामात सकाळच्या वेळी मदत करीत असतात तर काही पालकांना सकाळच्या वेळी काम असल्यामुळे ९.३० वाजता मुलींना तयार करून शाळेत पाठविता येणे शक्य होणार नाही. संस्थाचालकांनी पालकांची सभा बोलावून त्यांना विश्वासात घेऊन शाळेची वेळ बदलणे आवश्यक होते. मात्र तसे न करता संस्थाचालकांनी शाळेच्या पारितोषिक समारंभात जूनपासून प्राथमिक शाळेची वेळ बदलण्याची घोषणा केली. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पालकांनी दोन वेळा संस्थेच्या अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांची बोळवण करून त्यांना भेट नाकारण्यात आली. तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त शाळेच्या कोणत्याही कारभारात लक्ष घालत नाहीत, असा तक्रारीचा सूर पालकांनी लावला आहे. अखेर पालकांनी या संदर्भात स्थानिक आमदार अरविंद नेरकर यांच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार नाही. पूर्वीप्रमाणेच सकाळी ११ ते दुपारी ४.४५ या वेळेत शाळा भरेल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांना दिले आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आश्वासन लेखी स्वरुपात द्यावे, असा आग्रह पालकांनी धरला आहे.