Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

राष्ट्रा-राष्ट्रांतील वादांचा दारूगोळा सांस्कृतिक पुल उद्ध्वस्त करतो आणि तरीही संस्कृतीचे सूर सीमांना न जुमानता वाहत राहतात. म्हणूनच पाकिस्तानी गज़्‍ाल गायिका इकबाल बानोच्या निधनाच्या वार्तेने केवल पाकिस्तानातच नव्हे तर अलीकडे भारत आणि पलीकडे अफगाणिस्तान, इराणमध्येही काही सुरेल आठवणी चाळवल्या जाणार आहेत. इकबाल बानो मूळची दिल्लीची. तिचा जन्म रोहतकमधला, १९३५चा. गोड गळ्याच्या इकबाल बानोचे गाणे फुलले त्याचे पहिले श्रेय तिच्या उदारमतवादी वडिलांना आणि त्यानंतर पतीला द्यावेच लागेल.

 

तिच्यातले गुण पाहून वडिलांनी तिला दिल्ली घराण्याच्या उस्ताद चाँद खाँसाहेबांची शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची तालीम देवविली. उस्ताद चाँद खाँसाहेबांची ती गंडाबंध शागिर्द झाली. या उस्तादांनीच ऑल इंडिया रेडिओवर आपल्या या किशोरवयीन शिष्येची कारकीर्द सुरू करून दिली. वयाच्या सतराव्या वर्षी, १९५२ मध्ये इकबाल बानो विवाह करून पाकिस्तानात गेली. पाकिस्तानातल्या जमीनदाराशी तिचा विवाह झाला तो त्याने तिची गाण्याची तालीम थांबवायची नाही या अटीवरच. त्याने आपले वचन पाळले, इतकेच नव्हे तर तिचे गाणे सर्वार्थाने फुलेल, असे पाहिले. इकबाल बानोची कीर्ती रेडिओ पाकिस्तानवरून पसरत गेली. १९५७मध्ये लाहोर आर्ट्स कौन्सिलमध्ये तिचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. शास्त्रीय संगीतातली तालीम घेतली असली तरी इकबाल बानोचे नाव मुख्यत: झाले ते गज़्‍ाल क्वीन म्हणून आणि ठुमरी-दादऱ्यासाठी. फैज़्‍ा अहमद फैज़्‍ाची गज़्‍ाल गाणे हे आजही पाकिस्तानी गायक-गायिकांना प्रतिष्ठेचे वाटते. तो काळ तर फैज़्‍ाच्या गज़्‍ालांनी भारावून गेलेला होता. इकबाल बानोनं गायिलेल्या फैज़्‍ाच्या गज़्‍ाल इतक्या गाजल्या की फैज़्‍ा आणि इकबाल बानो हे एक समीकरणच होऊन बसले. वास्तविक फैज़्‍ावर सरकारची खप्पा मर्जी झालेली, रावलपिंडी कटाच्या खटल्यात त्याला तुरुंगवास भोगावा लागलेला. झियाच्या कारकीर्दीत लष्करशाहीची पर्वा न करता ५० हजारांच्या जनसमूहापुढे इकबाल बानोने फैज़्‍ाची ‘हम देखेंगे’ ही नज्म्म गायिली तेव्हा सारा श्रोतृवंृद तिच्या भावनेशी एकरूप झाला होता- सरकारची पर्वा न करता! इकबाल बानोने फैज़्‍ाची ‘हम देखेंगे’ अमर केली. परिणामी लष्करशाहीची खप्पा मर्जी तिच्यावरही झाली, पण लोकप्रियता मात्र वाढतच गेली! फैज़्‍ाप्रमाणेच! फैज़्‍ाव्यतिरिक्त इकबाल बानोने गमलिब, दागम् यांच्याही गज़्‍ाल गायल्या आहेत. ‘दश्ते-तनहाई में’, ‘उल्फत की नई मंजिम्ल’, ‘आया न रास नाला-ए-दिल’, ‘रंजिश ही सही’, ‘हम तो रुसवा हुए’, ‘लाई हयात आए कजम ले चली चले’, ‘मुद्दत हुई है यार को मेहमाँ किए हुए’ अशा गज़्‍ाल इकबाल बानोच्या सुरांनी सजल्या आहेत. ५०च्या दशकात तिने पाकिस्तानी चित्रपटांसाठीही गाणी म्हटली. ‘गुमनाम’, ‘कमतिल’, ‘इन्तकमम’, ‘सरफम्रोश’, ‘इश्क-ए-लैला’, ‘नागिन’ हे ५०च्या दशकातले तिच्या गाण्यांनी नटलेले चित्रपट. एकीकडे बेगम अख्म्तर आणि मलिका पुखराज तर तिकडे फम्रीदा खमनम आणि रोशन आरा बेगम या तिच्या समकालीन गज़्‍ाल गायिका. गज़्‍ालच्या दुनियेतला तगडय़ा स्पर्धेचा काळ. त्यात इकबाल बानोने आपले स्थान निर्माण केले होते. उर्दूबरोबरच ती फारसी गज़्‍ाल गायकीसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे अफगाणिस्तान आणि इराणपर्यंत तिची लोकप्रियता पोहोचली होती. तिने गायिलेल्या हाफिज़्‍ा आणि बेदिलच्या फारसी गज़्‍ाल अतिशय लोकप्रिय झाल्या. १९७९पूर्वीच्या अफगाणिस्तानमध्ये दरवर्षी ‘जश्ने-काबूल’ हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होत असे, त्यात इकबाल बानोची उपस्थिती अनिवार्य समजली जात असे. १९७४मध्ये पाकिस्तान सरकारने तिला ‘तमगम-ए-इम्तियाज़्‍ा’ हा प्रयोगधर्मी कला क्षेत्रातला त्यांच्याकडचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविले. २००० सालापर्यंत सतत पाच दशके कलेची सेवा केल्यानंतर इकबाल बानो वयाची हाक ऐकून स्वत:च थांबली. कारण गाण्यात गुणवत्तेची परिपूर्णता नसेल तर तडजोड करीत गाण्याचा तिचा स्वभाव नव्हता. पण म्हणूनच वयाच्या ७४व्या वर्षी, परवा ती जन्नतवासी झाली तरी इकबाल बानो म्हणताच सुरांचा एक गुज्मरा हुआ जम्माना रसिक मनात जागा होईल आणि म्हणेल, ‘ऐ जाने-जहाँ, रखा है दिल के रुखम्सार पर इस वक्त तेरी याद ने हाथ प्यार से.’