Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

मेष राशी
(२१ मार्च ते २० एप्रिल)

झोडियाक पॉवर रिन्गचा अनुकूल परिणाम
मेष व्यक्तींमधला साहसी उत्साह हा उतावीळ किंवा अधीर म्हणूनही पाहिला जातो. या उतावीळपणाचा त्यांना प्रसंगी तोटाही होतो. मात्र झोडियाक पॉवर रिन्ग्जच्या वापरामुळे हा प्रतिकूल परिणाम टाळता येऊ शकतो. त्यामुळे मेष व्यक्तींच्या आयुष्यात मुत्सद्दी नीतीचा अंतर्भाव होतो आणि भावनिक दौर्बल्यावर मात करून त्यांच्या निर्णयक्षमतेवर त्याचा अनुकूल परिणाम होतो.

मेष म्हणजे मेंढा. मेंढय़ाच्या चिन्हाची ही राशीचक्रातली आद्य राशी.
आद्य राशी असल्याने मेषेची व्यक्ती मुळात संस्थापक वृत्तीची असते. अनेक गोष्टीत पुढाकार घेऊन नवनवीन वाटा धुंडाळणारी असते.
मेष व्यक्ती लोकांशी खूपच मैत्रीपूर्ण आणि चटकन कुणाचंही सुहास्य वदनाने स्वागत करते. मेषेचा स्वामी मंगळ असल्याने, या राशीची व्यक्ती एरव्ही अवघड वाटणारं आव्हान स्वीकारण्यासाठी आणि ते तडीस नेण्यासाठी नेहमी तत्पर असते. नेहमीच

 

इतरांना मदत करण्याची वृत्ती हा स्थायीभाव. शिवाय स्वत:च्याच नाही तर इतरांच्या ध्येयपूर्तिसाठीही अंतिम क्षणापर्यंत सोबत राहून मेष व्यक्ती आपल्या खऱ्या मैत्रीचा बाणा टिकवून ठेवतात. निस्वार्थीपणे प्रेम करणं यांच्याकडूनच शिकावं. सतत उत्साही, निरागस, हुशारी आणि मनमिळाऊ वृत्ती हे यांचे स्वभावगुण आहेत. चटकन रागावणारी आणि क्षणार्धात राग निवळणारी अशी ही राशी आहे. एखाद्या कार्यात यश मिळाले नाही तरी या व्यक्ती मागे वळून पाहात नाहीत; जोमाने पुढे चालत राहणं हेच या राशीचं वैशिष्टय़ आहे. नेमून दिलेल्या कामापेक्षाही अधिक काम करण्याची यांची सतत तयारी असते. याच वैैशिष्टय़ामुळे परिश्रमी, कष्टाळू आणि मेहनती अशी त्यांची ओळख जनमानसात होते. नेतृत्वगुण यांच्या अंगी असल्याने प्रत्येक क्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही संकटांना तोंड देण्याची तयारी असते, मात्र जन्मठिकाणापासून दूर कार्य करण्याचा मानस असल्यास तो तितकासा सफल होत नाही, वा परदेशी यश संपादन करणं अवघड जाते. मात्र अतिमहत्वाकांक्षी वृत्ती यांना शांत बसू देत नाही. सतत धडपड करत काही तरी शिकण्यासाठी आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी या व्यक्ती कार्यशील असतात. सहचरी म्हणून मेष व्यक्ती भावनिक आणि सर्व इच्छापूर्ती करणारी आहे. पालक म्हणून ही राशी शिस्तबद्ध अधिक आहे. प्रसंगी कठोर होणं सहज जमतं. एखादी गोष्ट पटली नाही तर आपलं मत मांडण्यात ही व्यक्ती स्पष्टवक्तेपणा दाखवते. शिवाय एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा केल्याखेरीज कोणतीही गोष्ट करण्यास पुढे धजावत नाही. नियमांच्या विरोधात जाऊन वागणं वा नियम तोडणं अजिबात पटत नाही किंवा इतरांच्या बाबतीतही चुकीच्या गोष्टी यांच्याकडून सहन केल्या जात नाहीत. थोडक्यात मानी आणि शिस्तप्रिय ही विशेषणे यांना उत्तम लागू होतात.