Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पोहेगावच्या शेतकऱ्यांचा वीजप्रश्नी पाच तास ‘रास्ता रोको’
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीजप्रश्नी आज कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर

 

पाच तास भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. येत्या ४ मेपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याचे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांचे हाल झाले.
ग्रामीण भागात विजेचे १६ मे १८ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पोहेगाव परिसरात सिंगल फेजिंग योजना व तिचे काम त्वरित सुरू करावे, म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती. तालुका एज्युकेशन सोसायटीचे अशोकराव रोहमारे, सरपंच अशोक औताडे, पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे, एम. टी. रोहमारे, उपसभापती संजय शिंदे आदींसह ग्रामस्थ या आंदोलनाने सहभागी झाले होते.