Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमधील तरुणाची शिर्डीतील लॉजमध्ये आत्महत्या
राहाता, २४ एप्रिल/वार्ताहर

नाशिक येथील तरुणाने शिर्डीतील लॉजमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
सतीश रामनाथ टेखळे (वय २१, राहणार नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो घरातून

 

दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला शोधण्यासाठी त्यांचा भाऊ व त्यांचे दोन साथीदार शिर्डीत आज आले होते. त्या वेळी मयत सतीश याची मोटरसायकल हॉटेल साईवन्नापल्लीसमोर आढळली. सतीश आज सकाळी शिर्डीत आला. तो या लॉजमध्ये खोली क्रमांक १०७मध्ये उतरला होता. खोलीचा दरवाजा बंद करून त्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. हॉटेल व्यवस्थापक श्रीनिवास याने दिलेल्या खबरीवरून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.