Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वेगवेगळ्या घटनेत राहुरीत दोघांचा मृत्यू
देवळाली प्रवरा, २४ एप्रिल/वार्ताहर

राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. वरवंडी गावच्या शिवारातील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला.
वरवंडी गावच्या शिवारात हनमंता बेल्हेकर यांच्या विहिरीत आज सकाळी ७ वाजता एका

 

पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत अंजाबापू सूर्यभान ढगे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास सहायक फौजदार एस. एल. मुत्याल करीत आहेत. दुसरी घटना राहुरी येथे घडली. फरशी घासत असताना ग्राईंडिंग मशीनचा शॉक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संदीप सुदाम पवार (वय १९, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. राहुरी येथील सोन्याचे व्यापारी राजेश मैड यांच्या येथे तो फरशी घासत होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला. तपास हवालदार एस. डी. पवार, पोलीस कॉन्स्टेबल सप्तर्षी करीत आहे.