Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विखे पाटील महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार
राहाता, २४ एप्रिल/वार्ताहर

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना

 

विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज यांनी दिली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामाबद्दल महाविद्यालयास सन २००६-२००७ या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार या योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. आर. पांढरे यांना वितरित करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण पुणे विद्यापीठातील आयुका सभागृहात कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व डॉ. संजय चाकणे, डॉ. संभाजी पठारे, प्राचार्य टी. एन. कानवडे, डॉ. अरुण अडसूळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याबद्दल खासदार बाळासाहेब विखे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे, प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज यांनी अभिनंदन केले आहे.