Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठांनी युवा पिढीला मार्गदर्शन करावे - पाटणी
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

वडिलधारी, बुजुर्ग मंडळींनी सार्वजनिक संस्था व उद्योगातून थोडे बाजूला राहून आपले

 

अनुभव आणि योग्य मार्गदर्शन देत तरुणवर्गाला संधी द्यावी. युवा पिढीची आजची ती गरज आहे, असे प्रतिपादन लायन्सचे उपप्रांतपाल व औरंगाबाद जैन संघटनेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले.येथे महावीर भवनमध्ये आयोजित युवा मेळावा व ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचे उद्घाटन औरंगाबादचे उद्योजक संजय कासलीवाल यांच्या हस्ते झाले.
श्री. पाटणी म्हणाले की, जैन समाजाने पंथभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. सर्वानी संघटना, ताकद निर्माण करून सामाजिक प्रगती करावी. लग्नकार्य, विविध समारंभ वेळेवर करून लोकांचा वेळ वाचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी डॉ. अभय दगडे यांनी स्वागत केले. पाटणी, कासलीवाल, ललित पाटणी, सी. बी. गंगवाल आदींचा समाजाचे सरपंच पी. सी. ठोळे व केशरचंद ठोळे यांनी सत्कार केला. याप्रसंगी अजित लोहाडे, प्रियंका गंगवाल, कोमल गंगवाल, निर्मला कासलीवाल यांची भाषणे झाली. पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे, संचालक अतुल काळे उपस्थित होते. आर. के. काले यांनी आभार मानले.