Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पेन्शन मिळण्यास विलंब; निराधार निवृत्तांची कुचंबणा
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

पेन्शन मिळण्यास विलंब झाल्यामुळे वृद्ध-विकलांग व कुठलेही उत्पन्न नसलेल्या निराधार

 

निवृत्तांचे हाल होत आहेत. सरकारने महिन्याच्या १ तारखेलाच पेन्शन द्यावी, अशी मागणी जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
पहिला पंधरवडा उलटला, तरी अनेकदा पेन्शन बँक खात्यात जमा झालेली नसते. त्यामुळे पेन्शनरांना जीवनावश्यक गरजा भागविणे जिकिरीचे होते. या महिन्यात तर निवडणुकीत सरकारी अधिकारी-कर्मचारी मग्न असल्याने अद्याप पेन्शन जमा झालेली आहे, असे सांगण्यात आले.
जे देय आहे, हक्काचे आहे ते मिळविण्यासाठी प्रशासनाने सेवानिवृत्तांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये, असेही पत्रकात म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष ग. रा. पोखरकर, सरचिटणीस दा. र. सुतार, कार्याध्यक्ष आर. टी. सांगळे आदींच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत.