Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पत्रकार मुकुंद जोशी यांना प्रेस क्लबतर्फे श्रद्धांजली
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

दिवंगत पत्रकार मुकुंद जोशी यांना आज अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात

 

आली. कुटुंबीयांच्या मदतीसाठी संघटनेच्या वतीने निधी संकलनातून अर्थसाहाय्य करण्याचे या वेळी ठरले.
दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मुकुंद जोशी यांचे गेल्या शनिवारी हृदयविकाराने अकाली निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संघटनेच्या वतीने सभा बोलावण्यात आली होती.
शहर बँकेच्या सभागृहात झालेल्या या सभेला आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब हराळ, नगरसेवक संजय चोपडा, तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, नंदकुमार सोनार, डॉ. गिरीश कुलकर्णी, मीनाताई मुनोत आदी उपस्थित होते.