Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘अंतर्गत सजावटीचा सौंदर्य हा आत्मा’
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

सौंदर्य हा अंतर्गत सजावटीचा आत्मा आहे. त्यामुळेच वास्तूला नवा चेहरा, व्यक्तित्व मिळते.

 

वास्तूला जीवंतपणा देणे हेच अंतर्गत सजावटकाराचे काम आहे, असे प्रतिपादन विकॉन प्रोजेक्टस्च्या संचालिका रश्मी कुलकर्णी यांनी केले. आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हेअर्स असोसिएशन (एस्सा) व इंटेरिअर डिझायनर असोसिएशनतर्फे आयोजित संवाद सभेत श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एस्सा’चे अध्यक्ष अच्युतराव देशमुख होते.
वास्तू कशी सजावता येते, अंतर्गत सजावट क्षेत्रात आलेले नवनवीन ट्रेंड, आयटी कॉर्पोरेट क्षेत्रातील देशी-विदेशी कंपन्यांच्या सजावटीची कामे या संबंधी कुलकर्णी यांनी स्लाईड शोद्वारे माहिती दिली. विविध अनुभवही त्यांनी सांगितले. देशमुख, चंद्रकांत तागड यांचीही भाषणे झाली.
अनिता रणनवरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अजय दगडे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर बालटे यांनी आभार मानले. असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते.