Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कलाशिक्षणात यशाबरोबर आनंदही महत्त्वाचा - कांबळे
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

कोणत्याही कलेचे शिक्षण घेताना जीव ओतून काम केल्यास यश तर मिळतेच, शिवाय

 

आनंदही मिळतो असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले.
येथील डॉलवीन संघटनेतर्फे जानकीबाई आपटे बालिकाश्रमात आयोजित वारली पेटिंग शिबिरात कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. जयंत करंदीकर होते. वारलीतज्ज्ञ माधव डेहणकर, संघटनेच्या अध्यक्ष डॉ. गीता करंदीकर, डॉ. मराठे, डॉ. पल्लवी जोशी, डॉ. शर्ली थोलार आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी शिबिरार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली.