Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

समूहनृत्य स्पर्धेत एपी ग्रुप प्रथम
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

येथील कलादीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित जिल्हास्तरीय व वैयक्तिक नृत्य स्पर्धा मधुरंजनी

 

सभागृहात नुकत्याच पार पडल्या. समूहनृत्यात मोठय़ा गटात एपी ग्रुप, तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत लहान गटात अंकिता वडावकर व मोठय़ा गटात आशीष मिरपगार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पारितोषिक वितरण डॉ. निनाद अकोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी आशा दोमल, मुख्याध्यापक प्रकाश गरड, अनंत द्रवीड, संगीता कळसकर, पवन नाईक, संगीता मुळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिवेकर यांनी केले. आभार अनंत द्रवीड यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे - वैयक्तिक नृत्य (लहान गट) - प्रथम - अंकिता वडावकर, द्वितीय - शिवानी मुंडलिक, तृतीय - सार्थक ओहोळ. मोठा गट - प्रथम - आशीष मिरपगार, द्वितीय - प्रमोद गुंजाळ, तृतीय - किरण झोपळे, सौरभ कुलकर्णी. समूहनृत्य - मोठा गट - प्रथम - ए. पी. ग्रुप, द्वितीय - डेस्टिनी ग्रुप, तृतीय - एस. आर. ग्रुप. छोटा गट - प्रथम -डेस्टिनी ग्रुप, द्वितीय - डेस्टिनी ग्रुप, तृतीय डी. डी. अ‍ॅकेडमी.