Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खो-खो प्रशिक्षकांसाठी लोणावळ्याला शिबिर
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

खो-खो खेळाच्या प्रशिक्षकांसाठी महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर ५ ते १५

 

मेदरम्यान लोणावळा येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्राच्या मातीतील या अस्सल खेळास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, राज्य खो-खो संघटना व पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रवेशासाठी प्रशिक्षक-शिक्षक किमान जिल्हास्तरावर खेळलेला असावा. बीपीएड किंवा एमपीएड शिक्षकांना प्राधान्य मिळेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना परीक्षेनंतर प्रमाणपत्र दिले जाईल.
शिबिरात खो-खो खेळातील बदलते कौशल्य व तंत्र, आहार, आरोग्य, शरीरविज्ञान शास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, प्रथमोपचार, योगा, क्रीडावैद्यक, नवीन नियमावली याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी ३ हजार ५०० रुपये शुल्क आहे.
या शिबिराचा खो-खो प्रेमी, खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा कार्यालय (दूरध्वनी २४७०४१५) किंवा खो-खोचे राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर (मोबाईल ९४२३१७४३३७) यांच्याशी संपर्क साधावा.