Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आनंदऋषी जीवन परिचय यात्रेला चांगला प्रतिसाद
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रमण परंपरेतील आचार्य आनंदऋषी यांची जन्मभूमी, दीक्षाभूमी,

 

कर्मभूमी व परिनिर्वाण भूमीला भेट देण्यासाठी आयोजित ‘आनंदऋषी जीवन परिचय यात्रे’ला चांगला प्रतिसाद मिळाला.
या यात्रेची संकल्पना आचार्याचे शिष्य कुंदनऋषीमहाराजांची आहे. जैन बांधवांनी वर्षांतून एकदा ही यात्रा करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. ही संकल्पना साकार करण्यासाठी मिरी श्रावक संघाच्या श्रीगुरू आनंद गोशाळेची कार्यकारिणी व जैन आनंद तीर्थयात्रा संघाचे प्रमुख कार्यकर्ते धनेश कोठारी, हर्षल बलदोटा, राजेश मेहेर, राजू बोरा यांनी या यात्रेची व्यवस्था केली.
मुंबई येथील श्रीश्रीवक संघ, वडगाव मावळ येथील श्रीसंघाने दि. १९ला दीक्षाभूमी मिरी, जन्मभूमी चिचोंडी व परिनिर्वाण भूमी नगरला भेट दिली. त्यांच्या समवेत पारस मोदी, बाळासाहेब चोरडिया, विजय राजू डांगा, अनिल जैन, चंपालाल बाफना, कांतिलाल बोथरा आदी होते. सूत्रसंचालन दिलीप मुनोत यांनी केले, तर आभार संतोष गुगळे, रतिलाल गुंदेचा यांनी मानले.