Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिरसाठ मळ्यातील भागवत कथा महोत्सवाची ग्रंथदिंडीने सांगता
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

येथील शिरसाठ मळ्यात आयोजित श्रीमद्भागवत कथा सोहळ्याची सांगता ग्रंथदिंडीने झाली. या

 

वेळी श्रीकृष्णचंद्र ठाकूरमहाराज यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.
शिरसाठ मळा, भगवानबाबा चौक, निर्मलनगर, हनुमान मंदिर परिसरातून ग्रंथदिंडी व रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. संयोजक अशोक शिरसाठ यांनी भागवत ग्रंथ डोक्यावर घेतला होता. महिला-पुरूष भाविक मोठय़ा संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर तारकेश्वर गडाचे मठाधिपती नारायणमहाराज यांचे शिष्य लक्ष्मणमहाराज यांचे काल्याच्या कीर्तन झाले. महाप्रसादानंतर सप्ताहाची सांगता झाली. पुढील वर्षी मुरारीबापूंना सप्ताहासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.