Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

लोकसेवा की युवा?
रवींद्र पांचाळ

मुंबई उत्तर मतदारसंघात उत्तर प्रदेशीयांचा टक्का वाढत चालला असला आणि दहिसर पश्चिमेकडील अत्यंत गलिच्छ अशा गणपत पाटील नगराप्रमाणे जाणीवपूर्वक वाढवला जात असला तरी या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मराठी भाषिक आणि त्याखालोखाल गुजराती मतदार ठरवणार आहेत. दहिसर गावठाण, मालवणी, केतकीपाडा, देवीपाडा, शिवाजीनगर या जुन्या वस्त्या वगळता गेल्या पाच वर्षांत दहिसर खाडीमध्येच वसवण्यात आलेल्या उत्तर प्रदेशीयांच्या अनधिकृत वस्त्यांचा फायदा मतांसाठी सत्ताधारी काँग्रेसलाच होणार हे उघड असले तरी सत्ताधाऱ्यांच्या या बेमुर्वतखोरीचा निषेध व्यक्त करण्याची आयती संधी मुंबई उत्तरमधील मतदारांपुढे चालून आली आहे.

नवी मुंबईत सापडली १० हजार बोगस रेशनकार्डे
दोघांना अटक; बडय़ा नेत्याच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल
नवी मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी
मुंबई, तसेच ठाणे जिल्ह्यातील मतदानाला उण्यापुऱ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक असतानाच नवी मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा बेलापूर दिवाळे येथील एका इमारतीत छापा टाकून सुमारे दहा हजारांहून अधिक बोगस रेशनकार्ड, तसेच पॅनकार्ड आणि कंपन्यांचे ओळखपत्र बनविण्याचे नमुने हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे या विभागातील विभागप्रमुख शिरीष घरत, तसेच नगरसेवक अभिमन्यू कोळी यांनी या ठिकाणी हल्लाबोल करून हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी हा छापा टाकला.

कंदहार अपहरणातील १६६ लोकांना मरण्यासाठी सोडून द्यायला हवे होते का?
यशवंत सिन्हा यांचा काँग्रेसला सवाल
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी
कंदहार विमान अपहरण आज काँग्रेस भाजपला दोष देत आहे. परंतु अपहरण झालेल्या विमानातील १६६ लोकांना मरण्यासाठी कंदहारमध्ये सोडून द्यायला हवे होते, असे काँग्रेसने स्पष्टपणे बोलावे, असे आव्हान भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी दिले.कंदहार विमान अपहरण प्रकरणात कोणती भूमिका घ्यायची याबाबत तत्कालीन रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळात चर्चा झाली होती. याखेरीज विविध राजकीय पक्षांचे मत घेण्यात आले होते. अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या १६६ लोकांचे जीव वाचवा, अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेतली होती.

ग्राहक न्यायालयांना निवडणूक कामाला जुंपण्यास मनाई
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

राज्यातील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा ग्राहक तक्रार निवरण मंच या ग्राहक न्यायालयांचे न्यायाधीश व कर्मचारी यांच्या सेवा आणि या न्यायालयांच्या जागा निवडणुकीच्या कामासाठी अधिग्रहीत करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज मनाई केली.निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सरकारी व निम-सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक उपक्रम यांचे कर्मचारी मागून घेण्याचे जे अधिकार निवडणूक आयोगास राज्यघटनेने तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्याने दिले आहेत त्यात न्यायालयांचे कर्मचारी व त्यांच्या जागा निवडणूक कामासाठी घेण्याचा समवेश असल्याचे आम्हास सकृद्दर्शनी वाटत नाही.

दुसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी ५३ टक्के मतदान ; ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कमी मतदान
मुंबई, २४ एप्रिल / खास प्रतिनिधी
दुसऱ्या टप्प्यातील २५ मतदारसंघांमध्ये गुरुवारी ५२.४२ टक्के एवढे मतदान झाले आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यांतील निवडणुकीत सरासरी ५३ टक्के एवढेच मतदान झाले आहे. कमी मतदान झाल्यामुळे कोणाला फटका बसणार यांचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी घेऊ लागले आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये कमी मतदान झाले आहे. कमी मतदानामुळे सत्ताधारी आघाडीची चिंता मात्र वाढली आहे.

भाजप विरोधात इतर सगळे
राजेंद्र येवलेकर

कर्नाटकात २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका व आताची निवडणूक यात फरक आहे. राजकीय चित्र खूपच बदलले आहे. राज्यातील २८ मतदारसंघांपैकी ६ नवीन आहेत, तर २२ मतदारसंघांची फेररचना करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांत जनता दल (सेक्युलर), भाजप व काँग्रेस अशा तिरंगी लढती आहेत. मे २००४ मध्ये या लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात भाजपने लोकसभेला १८ तर विधानसभेला २२४ पैकी ७९ जागा पटकावून सत्तेचा लंबक आपल्याकडे झुकल्याचे दाखवून दिले होते.

सेना-भाजपने सतत विघटनवादीशक्तींना प्रोत्साहन दिले - मुख्यमंत्री
कल्याण, २४ एप्रिल/वार्ताहर

शिवसेना-भाजपा निवडणुका आल्या की, भावनेला हात घालतात. भाषा आणि प्रांतवादाच्या नावावर मतदारांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान नेहमीच केले असून विघटनवादी शक्तींना प्रोत्साहन दिले आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री जाहीर सभेसाठी कल्याणातील वासुदेव बळवंत फडके मैदानावर आयोजित केली होती.

प्रचारसभा आणि मतांचा जोगवा !
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबईत आता प्रचारसभांनी जोर धरला असून या अखेरच्या टप्प्यात मतदारांपुढे जाऊन विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मतांचा जोगवा मागत आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील आदींच्या तोफा आता मुंबई- ठाण्याच्या कानाकोपऱ्यात धडाडत आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडल्या आहेत. शिरीष पारकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी बुधवारी दहिसरच्या नवागाव विभागात जंगी सभा घेतली.

युतीला राज्यात ३२ पेक्षा जास्त जागा मिळतील- मुंडे
ठाणे, २४ एप्रिल/प्रतिनिधी

माढा आणि बारामतीमधील मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मती फिरली असून, पंतप्रधानपदाबाबतचा त्यांचा दुटप्पीपणाही राज्यातील जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला पोषक वातावरण असून, किमान ३२ जागा मिळतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज मुरबाड येथील जाहीर सभेत केला.

बसप कार्यकर्त्यांच्या डोक्यांवर ‘हत्ती’ !
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

राज्यातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता पाच-सहा दिवस उरलेले असल्याने मतदारांना भुरळ घालण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक अनेक क्लृप्त्या शोधून काढत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातील बसपचे उमेदवार हाजी इब्राहीम शेख ऊर्फ भाईजान यांच्या प्रचारासाठी आज ३० तरुणांनी चक्क मुंडण करून घेतले असून डोक्यावर पक्षाची निशाणी असलेल्या हत्तीचे आणि भाईजान यांची छबी असलेले स्टीकर चिकटविले आहेत.

हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई; सबका दुष्मन है भाजपाई - लालू
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

अडवाणींच्या कुंडलीतच पंतप्रधानपद नाही. राम मंदिर बांधणार होते, मग सहा वर्षांत भाजपवाल्यांनी का राम मंदिर बांधले नाही? या देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी लक्षात ठेवावे,’’ हिंदू-मुस्लिम, सिख, ईसाई सबका दुष्मन है भाजपाई,’’ अशी घोषणा लालूप्रसाद यादव यांनी समाजवादी पार्टीचे उत्तर-पश्चिम मुंबईतील उमेदवार अबू आसीम आझमी यांच्या प्रचारसभेत केली आणि उपस्थित गर्दीने टाळ्या, शिटय़ांच्या गदारोळात सभास्थान डोक्यावर घेतले.

पाठिंबा अन् खोळंबा
तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा नकार
नवी दिल्ली, २४ एप्रिल/पीटीआय
आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याकरिता तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार नसल्याचे काँग्रेसने आज स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस मित्रपक्षांच्या सहाय्याने केंद्रात सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल असे काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी आज सांगितले.

काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याला डाव्यांचा विरोध नाही
नवी दिल्ली, २४ एप्रिल/पीटीआय

तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायला डावे पक्ष विरोध करणार नाहीत, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे. डावे पक्ष आणि त्यांच्या तिसऱ्या आघाडीतील घटक पक्ष लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर एकत्रितपणे यासंबंधी निर्णय घेतील, असेही करात यांनी म्हटले आहे.

मनमोहनसिंग यांच्या नावाबाबत तडजोड नाही - काँग्रेस
कोलकाता, २४ एप्रिल/पीटीआय

काँग्रेसचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार मनमोहनसिंग यांच्या नावाबद्दल आम्ही ठाम असून लोकसभा निवडणुकांनंतरदेखील त्यांच्या नावाबाबत फेरविचार किंवा तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे काँग्रेस पक्षाने आज स्पष्ट केले. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत यूपीएतील घटक पक्ष वक्तव्ये करून काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा प्रयत्नांना भीक न घालण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

भारताचा पाकिस्तान होणे टाळण्यासाठी ‘एनडीए’ला दूर ठेवा - पवार
नवी मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जातीपातीत कलह निर्माण करून भारतासारख्या सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणाऱ्या देशाला तोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. अशा प्रकारच्या कलहामुळे पाकिस्तानची शकले उडू लागली आहेत. भारताला पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी भाजपाप्रणित एनडीए आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोपरखैरणे येथे केले.

मला न्याय केव्हा मिळणार?
शिवसेनेच्या व्यासपीठावर स्मिता साळसकर यांचा सवाल
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यात माझे पती आणि पोलीस अधिकारी विजय साळसकर हे शहीद झाले त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांपैकी एक अजमल कसाब याला कधी शिक्षा होणार आणि मला कधी न्याय मिळणार, असा करूण सवाल स्मिता साळसकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथे आयोजित सभेत श्रीमती साळसकर बोलत होत्या.