Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्कोडाची सुपर्ब मोटार औरंगाबाद बाजारपेठेत
औरंगाबाद, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

स्कोडा इंडिया मोटार उत्पादनामध्ये युरोपात सर्वाधिक वेगाने आघाडी घेणाऱ्या स्कोडा सुपर्ब ही मोटार बाजारात आणली आहे. स्कोडा इंडियाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात ही मोटार औरंगाबादच्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात स्कोडा ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जिन मारी लाजे आणि सारा मोटर्सचे संचालक सचिन मुळे व मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत स्कोडा सुपर्ब ही मोटार औरंगाबादच्या बाजारात आणण्यात आली आहे. डिझेल मोटार चाहत्यांसाठी ही गाडी अनोखी भेटच म्हणावी लागेल.
या मोटारीमध्ये सहा स्पीड ऑटोमॅटिक डीएसजी, मॅन्युअल्स टिपट्रॉनिक्स गेअर बदलण्याची व्यवस्था आहे.
यातील इंजिन दोन क्षमतेचे आहे. पंप डय़ूस तंत्रज्ञानासह टर्बो चेंजरबरोबर उच्च दाबाची डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम आहे. भारतीय रस्ते आणि वातावरणाला पूर्णपणे जुळवून घेणाऱ्या या मोटारीचे इंजिन वेग आणि इंधनाचा परिपूर्ण वावर या बाबतीत अद्वितीय ठरणार आहे.
मोटार वापरणाऱ्यांच्या सोयीसुविधांकडे लक्ष ठेवूनच स्कोडाने हे मॉडेल विकसित केले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाईन यांचा अजोड मिलाफ या मोटारीमध्ये आहे, असे स्कोडाचे व्यवस्थापकीय संचालक जिन मारी लाजे यांनी सांगितले. नवीन सुपर रेंजमध्ये डिझेल प्रकारात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मोटारीला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळेच या श्रेणीत नवीन मॉडेल बाजारात इतक्या लवकर आणण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
ही मोटार सौंदर्यदृष्टीला अनुसरून अतिशय आकर्षक रंगामध्ये उपलब्ध आहे. या मोटारीची महाराष्ट्रातील दालनातील किंमत २१ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
जागतिक स्तरावर सुपर्बने अनेक पुरस्कार मिळविलेले आहेत. जर्मनीतील बिल्ड अ‍ॅण्ड सोनॅटॅग, एआरबीओ हे पुरस्कार सुपर्बला मिळाले आहेत. स्कोडा इंडिया ही कंपनी औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक परिसरात उभारण्यात आली आहे. ३० हजार स्क्वेअर मीटर परिसरात हा भव्य प्रकल्प सुरू आहे. स्कोडा सुपर्ब, स्कोडा ऑक्ट्रोव्हिया, स्कोडा लॉरा आणि स्कोडा फाबिया हे चार मॉडेल उपलब्ध केले आहेत. आतापर्यंत स्कोडाने ६१ हजार मोटारी विकल्या आहेत.