Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लातूरमध्ये ५५ टक्के मतदान
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभेच्या लातूर मतदारसंघात १५ लाख ६ हजार २९२ मतदारांपैकी ८ लाख २९ हजार २२२ मतदारांनी काल मतदान केले. मतदानाचे प्रमाण ५५.०५ टक्के असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी आज दिली.
सर्वाधिक, ६१.२० टक्के मतदान लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात व सर्वात कमी ५०.०४ टक्के मतदान लातूर शहर विधानसभा मतदारसंघात झाले. झालेल्या मतदानात चार लाख ५४ हजार ६६८ पुरुष मतदारांनी, तर ३ लाख ७४ हजार ५५४ स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला.
पुरुष मतदारांचे प्रमाण ५७.५३ व महिला मतदारांचे प्रमाण ५२.३२ टक्के आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान असे : लातूर ग्रामीण - १ लाख ५७ हजार ७२८, लातूर शहर - १ लाख ३६ हजार ९४१, अहमदपूर - १ लाख ४४ हजार ४१२, उदगीर - १ लाख ३१ हजार ७६८, निलंगा - १ लाख ४९ हजार ४७८, लोहा - १ लाख ८ हजार ८९५.