Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उस्मानाबाद मतदारसंघात ५७ टक्के मतदान
उस्मानाबाद, २४ एप्रिल/वार्ताहर

 

उस्मानाबाद मतदारसंघात काल झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी आज सायंकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आली. एकूण ५७.५९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभेच्या बार्शी मतदारसंघातील मतपेटय़ा घेऊन येणारी वाहने आज सकाळी ७ वाजता पोहोचली. तत्पूर्वी रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाली नव्हती.
एकूण १६ लाख तीन हजार ३९३ मतदारांपैकी नऊ लाख २३ हजार ४१९ मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक, ५९.१० टक्के मतदान तुळजापूर मतदारसंघात व सर्वात कमी ५३.२४ टक्के मतदान बार्शी मतदारसंघात झाले.महिला मतदारांचे प्रमाण ५४.५१ टक्के व पुरुष मतदारांचे प्रमाण ६०.३८ टक्के आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : औसा ५६.८९, उमरगा ५८.६१, तुळजापूर ५९.१०, उस्मानाबाद ५८.६८, परंडा ५८.७३ आणि बार्शी ५३.२४.
आज दिवसभर प्रशासनाच्या वतीने निवडणूक निरीक्षकासोबत बैठक सुरू होती. त्यामुळे अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.