Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. हेडगेवार दंत विद्यालयातर्फे मोफत दंतचिकित्सेची सोय
हिंगोली, २४ एप्रिल/वार्ताहर

 

डॉ. हेडगेवार स्मृती सेवा समितीच्या वतीने हिंगोली दंत विद्यालयाच्या वतीने मोफत दंत चिकित्सा केली जात असून दाताची कवळी नि:शुल्क देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ब्रिजलालजी खुराणा यांनी सांगितले. हेडगेवार दंत विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. चाटोरीकर, अनिल गावंड, डॉ. व्ही. एस. मोहन, डॉ. कार्तिक भानुशाली, डॉ. चांदूरीकर, डॉ. मुंदडा, डॉ. विवेक साठे आदींची उपस्थिती होती.
डॉ. साठे यांनी संस्थेतील दंत चिकित्साविषयक माहिती दिली. यावेळी दंत विद्यालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना ब्रिजलाल खुराणा यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना शहराच्या ठिकाणी येणे जिकिरीचे बनल्याने लवकर दातांची तपासणी करण्यासाठी मोबाईल व्हॅन सुरू करण्यात येत आहे. दंत विद्यालयाच्या वतीने मोफत दातांची कवळी देण्यात येणार असून दातांचा त्रास असेल अशा व्यक्तींनी दंत विद्यालयात तपासून घेतल्यास तीन ते चार दिवसांत दातांची कवळी दिली जाईल, असे सांगितले बाळासाहेब अणेवार यांनी आभार मानले.