Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘उपक्रम स्तुत्य’
‘लोकसत्ता-कॅम्पस’ मूड कॅम्पेनची सुरुवात साठय़े महाविद्यालयापासून झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त होता. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर आणि

 

‘लोकसत्ता’ तरुणांपर्यंत पोहोचत आहेत ही चांगली बाब आहे, असे मत साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे यांनी व्यक्त केले. कायदा पाळण्यापेक्षा तो तोडूनही आपण त्याच्या कचाटय़ात कसे सापडलो नाही, ते सांगण्यात आपल्याला कसा अभिमान वाटतो, त्याचे वर्णन अतुल कुलकर्णी यांनी केले होते. त्यात त्यांनी दिलेली उदाहरणे चपखल होती, असेही त्या म्हणाल्या. आपण वाहतुकीचे नियम कशा प्रकारे मोडतो, सिग्नल तोडून जायला कसे पुढे- मागे बघत नाही, ही उदाहरणे आपल्याला विशेष आवडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘अग्नी’ आणि ‘जागो र’च्या माध्यमातून साठय़े महाविद्यलयातील ८०० विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवले आहे याचा आपल्याला खूप आनंद आहे, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. त्याचबरोबर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांद्वारे तरुणांनी अधिकधिक माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. तेव्हा लोक बाहेरगावी जातात व मतदान करत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाबद्दल त्या म्हणाल्या की, हा एक स्तुत्त्य उपक्रम आहे. तरुण पिढीला राजकारणात व समाजकारणात रस असणे आवश्यक आहे.
‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. रेगे म्हणाल्या की, हा उपक्रम स्तुत्य आहे. तरुण पिढीला राजकारणात व समाजकारणात रस असणे आवश्यक आहे. स्वत:च्या पलीकडे विचार करण्याची वृत्ती त्यांच्यात बाणवण्याच्या दृष्टीने असे उपक्रम आवश्यक वाटतात. सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवून त्या दृष्टीने कृती करणे आवश्यक आहे. लोकसत्ताने तरुणांना हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्याबद्दल त्यांनी लोकसत्ता आणि अतुल कुलकर्णी दोहोंचेही अभिनंदन केले. अतुल कुलकर्णीसारख्या प्रखर सामाजिक जाणीवा असलेल्या सेलिब्रिटीजच्या माध्यमातून हा संदेश तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल याचा मला विश्वास आहे.