Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

लोकसत्ता-कॅम्पस मूड कॅम्पेनला एमईटीतही उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी

साठय़े महाविद्यालयामध्ये लोकसत्ता-कॅम्पस मूडच्या मोहिमेची यशस्वी सुरुवात केल्यानंतर ‘लोकसत्ता-कॅम्पस मूड’ टीमने त्याच दिवशी दुपारी वांद्रे येथील एमईटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोहिमेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. एमईटी महाविद्यालयातील तरुणांशी इंग्रजीतून तरुणांशी संवाद साधण्यात आला. या विद्यार्थ्यांनी अतुल कुलकर्णीवर प्रश्नांचा अक्षरश: पाऊस पाडला. पक्षाला मत द्यावे की व्यक्तीला या प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले की, माझा कल खरेतर पक्षाची विचारसरणी बघून त्या पक्षालाच मत देण्याकडे आहे. पण कधीतरी अशी परिस्थिती उद्भवते की तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो.

‘उपक्रम स्तुत्य’
‘लोकसत्ता-कॅम्पस’ मूड कॅम्पेनची सुरुवात साठय़े महाविद्यालयापासून झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त होता. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर आणि ‘लोकसत्ता’ तरुणांपर्यंत पोहोचत आहेत ही चांगली बाब आहे, असे मत साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे यांनी व्यक्त केले. कायदा पाळण्यापेक्षा तो तोडूनही आपण त्याच्या कचाटय़ात कसे सापडलो नाही, ते सांगण्यात आपल्याला कसा अभिमान वाटतो, त्याचे वर्णन अतुल कुलकर्णी यांनी केले होते. त्यात त्यांनी दिलेली उदाहरणे चपखल होती, असेही त्या म्हणाल्या. आपण वाहतुकीचे नियम कशा प्रकारे मोडतो, सिग्नल तोडून जायला कसे पुढे- मागे बघत नाही, ही उदाहरणे आपल्याला विशेष आवडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘प्रिया हमारी दिदी है!’
प्रिया दत्त (काँग्रेस)

सकाळी साडेनऊपासून वांद्रे येथील जे. जे. कॉलनी परिसरात रहिवाशांची आणि कॉग्रेस कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक जण पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या स्थानावर उभा होता. कोणाच्या हातात पक्षाचे झेंडे होते तर काही जण हातात हार घेऊन उभे होते. काही रहिवाशी आणि कार्यकर्ते तेथील स्थानिक नगरसेवक राजा खान यांच्यासोबत फोटो काढत होतो. हे सर्व सुरू असेपर्यंत मॅडमची गाडी आली आणि परिसरातील वातारणच बदलून गेले. सर्वाना प्रतीक्षा होती ती खासदार प्रिया दत्त यांची. आल्या आल्या त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले आणि सर्वांनी मग एकच जल्लोष केला. या जल्लोषातच प्रिया दत्त यांनी जे. जे. कॉलनी परिसरातील गजबजलेल्या चिंचोळ्या रस्त्यावरून पदयात्रेस सुरूवात केली.

‘क्यों पडे हो चक्कर में..’
महेश जेठमलानी (भाजप)

सकाळी साडेनऊच्या सुमारास गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून शिवसेना-भाजप युतीचे झेंडे लावलेल्या गाडीतून अ‍ॅड. महेश जेठमलानी वांद्रे येथील एबी एक्झिक्युटिव्ह अर्पाटमेंटमधून वाकोलाच्या दिशेने निघाले. वाकोलामधील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गजबज सुरू होती. पक्ष कार्यालयात पोहोचताच सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जेठमलानी आपल्या ३०-३५ कार्यकर्त्यांसह पदयात्रेसाठी निघाले.

‘नगारा’ लोकसभेत पाठवा..
शिल्पा सरपोतदार (मनसे)

वाकोला पुलाजवळून सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांची प्रचारफेरी सुरू होणार होती. मात्र वाकोला येथेच मनसैनिक आणि काही स्थानिकांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. त्यांचे जोरदार स्वागत झाले आणि स्वागत स्वीकारता स्वीकारता सायंकाळचे साडेपाच कधी वाजले ते त्यांनाही कळले नाही. त्यानंतर मात्र खार सबवे, गोळीबार रोड, आंबेवाडी, डवरीनगर अशी दरमजल करीत प्रचारफेरी सुरू झाली.

ताई-माई-आक्का.. सगळीकडे आश्वासनांचा भुलभलैय्या
संजय बापट

राज्याच्या बहुतांश भागातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी संपल्यानंतर प्रचाराच्या तोफा आणि कार्यकर्त्यांच्या झुंडी आता मुंबई-ठाण्याकडे सरकू लागल्या आहेत. तब्बल २६ विधानसभा मतदार संघ असलेल्या ठाणे जिल्ह्यावर अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले असून त्याची प्रचीती भिवंडी लोकसभा मतदारसंघातही येत आहे. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाचा पहिला खासदार होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये सेना-भाजप युतीचे जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सुरेश टावरे, सपाचे आर. आर. पाटील, बसपाचे व्ही. जी. पाटील, मनसेचे डी. के. म्हात्रे, अपक्ष विश्वनाथ पाटील यांच्यासह १६ उमेदवार धावत आहेत.

मतदानाच्या व्यर्थपणामुळे निरुत्साह!
अतुल कुलकर्णी यांचा लेख वाचला. प्रत्येक सुशिक्षित मतदाराने निवडणुकीच्या बाबतीत उदासीन न राहता मतदानाचे पवित्र कर्तव्य केलेच पाहिजे व करायचे म्हटले तर काँग्रेस व भाजप या दोनपैकी एका पक्षाला मतदान करावे. म्हणजे आपली लोकशाही भक्कम होण्यासाठी थोडीफार मदत होईल, असा त्यांच्या लिखाणाचा सूर आहे. या लेखावर बऱ्याच प्रतिक्रिया वाचकांकडून येतील व त्यात निरनिराळ्या तऱ्हेने उलटसुलट विचार मांडले जातील. या मंथनातून काही लोणी हाती लागेल असे वाटले होते. त्याप्रमाणे २९ तारखेच्या लोकसत्तामध्ये प्रतिक्रिया आल्या आहेत.

घरंदाज वारसा
चार्लस् डार्विनला एका प्रतिष्ठित घराण्याचा वारसा लाभला.. इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यातील श्रूसबेरी या छोटय़ा गावातील घरंदाज डार्विन कुटुंबात माऊंट या त्यांच्या पिढीजात निवासस्थानी चार्लस्चा जन्म झाला. चार्लस्चे वडील डॉ. रॉबर्ट डार्विन होते एक प्रतिष्ठित आणि प्रथितयश डॉक्टर.. त्यांची पत्नी, चार्लस्ची आई सुसान्ना वेजवुड चिनी मातीची आकर्षक भांडी बनविणाऱ्या सुप्रसिद्ध वेजवुड घराण्यातली.. चार्लस् हे या दाम्पत्याचे पाचवे अपत्य अन् दुसरा मुलगा.. १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्मलेला.. सधन कुटुंबात जन्मल्यामुळे सुबत्तेत वाढलेला.

कैफियत पुनर्विकासाची..
मी आहे प्रामाणिकपणे म्हाडा वसाहतींचा विकास करू पाहणारा एक विकासक. पण मी आज हतबल झालो आहे ते म्हाडाच्या गेल्या दोन अडीच वर्षांंत सारख्या बदलत असलेल्या धोरणांमुळे. आज तब्बल अडीचशे सोसायटय़ांमधील रहिवासी गेल्या दोन-अडीच वर्षांंपासून भाडय़ाने राहत आहेत. म्हाडा वसाहतींना २.५ एफएसआय देण्याबाबतचे धोरण मंजूर झाले तेव्हा या सर्व लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या दुर्दैवाचे फेरे संपलेले नव्हते हे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करणार!
प्रत्येक पक्षाचे ढोबळ आश्वासन
प्रतिनिधी
मुंबईच्या प्रश्नांबाबत निवडून देण्यात आलेले खासदार काहीच करीत नाहीत, अशी नेहमी मुंबईकरांची तक्रार असते. अशावेळी लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या असताना मुंबईतून निवडून जाणारे खासदार मुंबईसाठी काही करणार आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात ‘अग्नि’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीने फक्त ढोबळ आश्वासने दिली.