Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

प्रमोद अग्रवालची शरणागती
२ मे पर्यंत पोलीस कोठडी

नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

अडीच वर्षांत दुप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो नागरिकांची कोटय़वधी रुपयाने फसवणूक करणाऱ्या प्रमोद अग्रवालने आज अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागात येऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन अग्रवालला येत्या २ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शहरात पाणी पेटले
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

नगरसेवकाची चालकांना मारहाण
टँकर चालकांच्या संपामुळे
पाणी टंचाईवरून महापालिकेतील विरोधी पक्षासह सत्तापक्षाचे नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. एका नगरसेवकाने टँकर चालकाला मारहाण केली तर, दुसऱ्या एका घटनेत दोन नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला.

गिरीश गांधी यांचे पाणी बचतीचे आवाहन
हॉटेल व्यावसायिकांना पाठवले पत्र

नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

देशातील एक-तृतीयांश जनतेला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागपुरातही जलसंकट भेडसावू लागले आहे. या भीषण स्थितीवर मात करण्यासाठी वनराई या संस्थेने पुढाकार घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन त्याचा अपव्यय टाळणे आणि त्याची बचत करण्याचे आवाहन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी हॉटेल्स व्यावसायिकांना केले आहे. यासाठी उपाययोजना सुचवणारे पत्रही त्यांनी शहरातील हॉटेल्सना पाठवले आहे.

थंडा थंडा ज्यूस.. मागणी वाढली
नागपूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

वाढत्या उकाडय़ातही शरीराचा उत्साह टिकवण्यासाठी फळांचा रस पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. उन्हाच्या काहिलीत फळांचा गारेगार रस सर्वोत्तम समजला जात असल्याने ‘ज्यूस सेंटर’ आणि उपाहारगृहांमध्ये फळांचा रस भरपूर प्रमाणात विकला जात आहे.

ऐन लग्नसराईत धान्य महागले
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महागाई निर्देशांकात लक्षणीय घट झाली असताना मागणीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचा बाजारपेठेत पुरवठा होत नसल्याने किमती अचानक वाढल्या आहेत. यंदा तांदूळ, डाळ आणि गव्हाच्या उत्पादनात घट झाली असून ऐन लग्नसराईच्या दिवसात धान्याच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशावर चांगलाच बोजा पडला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपर्यंत डाळी वगळता सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. महागाई निर्देशाकांतही घट झाली होती. मात्र, दुसऱ्या आठवडय़ात भाववाढीस सुरूवात झाली.

जनता पोरकी
पाणी टंचाई तीव्र, नेत्यांची पाठ,
पालकमंत्री निवडणुकीत व्यस्त

नागपूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

नागपूर शहरात आणि जिल्ह्य़ात नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना नेते मात्र त्यांच्या व्यक्तीगत कामात तर पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्य़ातील निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत तर अधिकारी आचारसंहितेचा बागुलबुवा पुढे करीत असल्याने जनता पोरकी झाली आहे.

गुंतवणुकीचा नेमका आकडा किती?
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महादेव लॅन्ड डेव्हलपर्सचा मालक प्रमोद अग्रवाल आज पोलिसांना शरण आला असला तरी, त्याच्याकडील गुंतवणुकीच्या आकडय़ाबाबत मात्र, अजूनही संभ्रम आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर हा आकडा तीनशे कोटींच्या घरात आहे, मात्र गुंतवणुकदारांची संख्या लक्षात घेतली तर, तो यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

छायाचित्रकार व कॅमेरामनला पोलिसांची धक्काबुक्की
निषेध नोंदवून पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नागपूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्वाच्या चर्चेचा विषय ठरलेल्या प्रमोद अग्रवालने आज गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्मसमर्पण केल्यानंतर त्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामनला गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या या वर्तवणुकीबद्दल छायाचित्रकारांनी निषेध व्यक्त केला व झालेल्या प्रकाराबद्दल पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

भोला सरवरांच्या ‘सरोकार’ लघुकथा संग्रहाचे प्रकाशन
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्स येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भोला सरवर यांच्या ‘सरोकार’ या हिंदी लघुकथा संग्रहाचे प्रकाशन मुख्य अभियंता आर.बी. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. सीजीओ कॉम्प्लेक्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन आणि अखिल भारतीय सीपीडब्ल्यूडी कार्यालय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडब्ल्यूसीचे निर्देशक व्ही.एन. वाकपांजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार एस.क्यू.जमा, सीजीईसीचे राष्ट्रीय महासचिव एन.एस. पिल्ले, डॉ. नंदिता साहू, डॉ. धनराज डहाट उपस्थित होते. संचालन राजीव पानतावणे यांनी केले. भोला सरवर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला दशरथ गहाणे, डी.जे. मेश्राम, जोगिन्दर पॉल, अभियंता एन. किशोर, अभियंता हेमंत हेडावू, अभियंता एस.जी. जनबादे आदींनी सहकार्य केले.

सोमवारी महात्मा बसवेश्वर जयंती
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोमवारी, २७ एप्रिलला विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आयुक्त आनंद लिमये यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.