Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘मुलांचे विचार समजून मदत करा’
नागपूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

मुलांच्या मनात नेमके कुठले विचार सुरू असतात, कोणत्या विचारांमध्ये ते जास्त गुंतलेले

 

असतात हे समजून घेऊन त्यावर मुलांना मदत केल्यास मुलांचे १० ते ३५ टक्के गुण कुठलीही शिकवणी न लावता सहज वाढतात, असे प्रतिपादन राजा आकाश यांनी केले आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनल हेल्थमध्ये (आय.आय.ई.एच.) मुलांना प्रत्येक विषय वैयक्तिकपणे शिकवला जातो. त्यामुळे त्यांना कुठल्याच शिकवणीची गरज पडत नाही. पालकांची काळजी दूर होते. मयुर अग्रवाल या विद्यार्थ्यांने कुठलीही टय़ुशन न लावता ६५ टक्क्यावरून ९३ टक्क्यांपर्यंत मजल मारली यासारखे अनेक विद्यार्थी आयआयईएचचा फायदा करून घेत आहेत व पालक सुद्धा चिंतामुक्त असल्याची जाहिरात यावेळी करण्यात आली. आयआयईएचचे संचालक नितीन पितळे म्हणाले, आजचा विद्यार्थी सहावी ते बारावीपर्यंत चार प्रकारच्या दबावात असतो. शाळा, शिकवणी, पालक आणि समाज. चारही तणाव बारावीनंतर निघून गेल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी अनेक विषयांना नापास होतात. पण हे विद्यार्थी व पालक दोघांच्याही लक्षात येत नाही. आय.आय.ई.एच.ची पद्धत वापरल्यास मुलांना स्वत:चा अभ्यास कसा करायचा, वाचलेले १०० टक्के कसे लक्षात ठेवायचे. नेमके पेपरच्या वेळेला कसे आठवायचे, एकाग्रता कशी वाढवायची हे शिकवले जाते. विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स केवळ शैक्षणिक मानसशास्त्रज्ञच अतिशय चांगल्याप्रकारे करू शकतो. कारण तो मुलांचा कल, आवड व योग्यता खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्यामुळे पालकांना निर्णय घेणे सोपे जाते, असे पितळे म्हणाले.