Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्र दिनाचा शासकीय कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

राज्याच्या ४९ व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम १ मे रोजी कस्तुरचंद पार्कवर

 

होणार असून पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी दिली.
आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीकडे जातीने लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिली. सकाळी ८.०० वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी ७.१५ ते ९.००वाजतादरम्यान, अन्य कुठेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, अशी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपूरकरांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत सीताबर्डी किल्ला खुला राहणार आहे.
या आढावा बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपायुक्त डी.एस. चिलमुलवार, सहपोलीस आयुक्त शांताराम वाघमारे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी कृष्णा खोब्रागडे, मनपा आयुक्त सिद्दीकी, राजशिष्टाचार अधिकारी प्रकाश शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, कार्यकारी अभियंता (विद्युत) खांबटकर, शिक्षणाधिकारी (जि.प.) महेश करजगावकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.