Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्वरवेधतर्फे आज ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’ कार्यक्रम
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

स्वरवेध या संस्थेतर्फे प्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांच्या मुलाखतीसह त्यांच्या २१ मराठी,

 

हिंदी गीतांचा ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’ हा बहारदार कार्यक्रम शनिवारी, २५ एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकृष्ण देशपांडे, विको लेबॉरटरीजचे प्रबंध संचालक जयंत पेंढरकर, मोटार परिवहन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त किरण गोसावी उपस्थित राहतील.
संकल्पना भानुदास कुळकर्णी यांची असून संचालन रेणुका देशकर करतील. गायक कलाकारांमध्ये अनिरुद्ध जोशी, सुरभी ढोमणे, निरंजन बोबडे, रसिका चाटी यांचा सहभाग आहे. तसेच, मोरेश्वर दहासहस्त्र, अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी (तबला), आनंद मास्टे, गोविंद गडीकर (सिन्थेसायझर), श्याम ओझा (हार्मोनियम), अरविंद उपाध्ये (बासरी), अमर शेंडे (व्हायोलीन), विक्रम जोशी (सहताल वाद्य) हे साथ करतील. हा कार्यक्रम नि:शुल्क असून रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वरवेधतर्फे करण्यात आले आहे.