Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सीएची महागडी कार जळाली
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

शंकरनगर परिसरातील दंडिगेले-आऊटमध्ये राहणाऱ्या एका चार्टर्ड अकाऊंटट्ची घरासमोर

 

ठेवलेली होंडा अकॉर्ड कारला आज पहाटे सव्वाचार वाजता अचानक आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली. मात्र, ती पूर्ण जळाली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे.
संजय कोठारी यांची ही कार (क्र. एमएच ३१ सीआर ४३८१) असून त्याची किंमत १५ लाख रुपये असल्याचे समजते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री १० वाजता त्यांनी कार घरापुढे उभी केली. पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास आवाज आल्याने ते बाहेर आले. लगेच त्यांनी ही माहिती अग्निशामक दलाला दिली.
जवानांनी आग विझवली. परंतु शेवटी कारचा सांगाडाच शिल्लक राहीला.
होंडा कंपनीची ही महागडी कार शहरातील मोजक्याच लोकांजवळ आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशामक दलाच्या सूत्रांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.