Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आजपासून संत गोरोबा पुण्यतिथी महोत्सव
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

कुंभार प्रगती मंडळाच्यावतीने लालगंज कुंभारपुऱ्यातील श्री संत गोरोबाकाका मठामध्ये श्री संत

 

शिरोमणी गोरोबा काकांचा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष गोपाल बनकर यांच्या हस्ते उद्या, २५ एप्रिलला ४.३० वाजता घटस्थापना व श्रींच्या प्रतिमेचे पूजन, महाआरती करण्यात येईल. याप्रसंगी कार्याध्यक्ष मधुकर राजूरकर, अरूण वाघ, नरेश जुगेले उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता दूरदर्शन, आकाशवाणी कलावंत सप्तखंजेरीवादक बालकीर्तनकार तुषार सुर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक कीर्तन होईल. यावेळी फकिरचंद चौधरी, राजाराम पाठक, रामलाल प्रजापती, रामभाऊ आमदे उपस्थित राहतील. रविवार, २६ एप्रिलला दुपारी ३ वाजता, सामाजिक निधी संकलन पेटीचे वितरण, डॉ. धामनकर आणि शंकर चुरागळे यांच्या हस्ते करण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता व्यंकट महाराज कावळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी महासंघ महिला आघाडी अध्यक्ष सरोजिनी कन्हेरे, कार्याध्यक्ष चंद्रकला चिकाने, उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुंभार प्रगती मंडळाचे सहसचिव सुरेश पाठक यांनी केले आहे.