Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कॅनाईन क्लबतर्फे आज ‘ऑल ब्रीड डॉग शो’
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर कॅनाईन क्लबतर्फे उद्या, शनिवारी सिव्हील लाईन्समधील हिस्लॉप कॉलेजच्या प्रांगणात

 

दुसरा ‘ऑल ब्रीड डॉग शो’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती क्लबचे प्रमुख गुरुमीरसिंग नरला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ‘डॉग शो’मध्ये २५० प्रजातींची विविध श्वान सहभागी होणार असून त्यात मिनिएचर, पिंचर, बुलडॉग, अफगाण हाऊंड, पसेत हाऊंड, बॉक्सर, बूलमास्टीफ, कारवान हाऊंड, कॉकर, स्पॅनिएल, डालमेशन, उशहाऊंड, डॉबरमन, होल्डन रिटायवर, ग्रेटडेन, चाऊचाऊ, लॅब्राडॉर, लासा, आपसो, निवोपोलिडीन, पामेरियन, रॉटविलर पग इत्यादींचा सहभाग आहे. यातील काही श्वानांची किंमत दीड ते दोन लाख आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, जहलपूर, रायपूर, कोलकाता, दिल्ली, भिलाई, अमरावती आदी शहरातील विविध श्वान या शोमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या श्वान मालकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘डॉग शो’ ला प्रारंभ होणार असून त्यासाठी नाममात्र १० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. संस्थेतर्फे प्राण्यांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या शोसंबंधी अधिक माहितीसाठी नागपूर कॅनाईन क्लब, नागपूर ९९२३००५०७१, ९३२६२२४५३२ या क्रमांकावर संपर्क साधावा. पत्रकार परिषदेला प्रमोद कानेटकर, विशाल मेंढे, कपिल मेंढे , समीर कापसे, राजेश मिश्रा, निखिल जवंजाळ, संजय डांगरे, मोहन नायडू उपस्थित होते.