Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बावणे कुणबी समाजाचा सोमवारी सामूहिक विवाह सोहोळा
नागपूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

बावणे कुणबी समाजाचा १६ वा सामूहिक विवाह सोहोळा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर

 

सोमवारी, २७ एप्रिलला सकाळी १०.०० वाजता रामनगर येथील समाज सभागृहात होणार आहे.
समाजाने सामूहिक विवाहाची सुरुवात १९९३ला केली. आजपर्यंत या सामूहिक विवाह सोहळ्यात २३५ जोडपी विवाहबद्ध झाली. यावर्षी सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध होणार आहे. नवदाम्पत्यास समाजाच्या वतीने संसार उपयोगी वस्तू भेट तसेच सोबतच विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे तसेच वधू-वर पालकांचा सत्कारही करण्यात येईल. हा सोहोळा यशस्वीततेसाठी अ‍ॅड. जी.डी. वैद्य, राजेंद्र भुते, दत्तात्रय निंबार्ते, सुनील कुकडे, नगरसेवक परिणय फुके, सुधाकर मारोडे, मदन शेंडे, विष्णू भुते, सुनील राघोर्ते, डॉ. विलास रेहपाडे, एकनाथ भोयर, कमलेश ठवकर, शंकरराव डोकरमारे, हरिभाऊ बान्ते, प्रा. मधुकर भोतमांगे, राजू गोडबोले, शेषराव सारवे, रामदास ठवकर, प्रा. रामेश्वर पाटेकर, ममता भोयर, सुनंदा चामट, सिंधू बान्ते, आरती सेलोकर, विभा भोतमांगे यांच्यासह कार्यकारी मंडळ परिश्रम घेत आहे. समाज बांधवांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव बाबा तुमसरे व संयोजक भोजराज बान्ते यांनी केले.