Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाथे करिअर अकादमीचा फाऊंडेशन कोर्स सुरू
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी नाथे करिअर अकादमीने

 

फाऊंडेशन कोर्स सुरू केला आहे. यामध्ये उमेदवारांना सर्वच स्पर्धा परीक्षांविषयी तुलनात्मक माहिती देण्यात येणार आहे.
आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या नोटस्, टेस्ट सिरीज, ग्रंथालय आदी सुविधा कोर्स फी मध्येच देण्यात येणार आहेत. आयोगाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले टेस्टपेपर्सचा सरावही करून घेण्यात येईल. स्पर्धा परीक्षार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, विषयानुरूप प्राविण्य प्राप्त करता यावे, यासाठी नियमित अभ्यासवर्ग चालवले जातात. फाऊंडेशन कोर्समुळे स्पर्धा परिक्षेतील निकाल उंचाविण्यास मदत होते. विशेष म्हणजे बारावीनंतर कोणालाही हा कोर्स करता येतो. यासाठी टक्केवारी किंवा प्रवेश परिक्षेची अट नाही. शिवाय हा कोर्स राज्यसरकारच्या इतर स्पर्धा परिक्षांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरत असून, अधिक माहितीसाठी नाथे करिअर अकादमी, मेडिकल चौक, हनुमाननगर येथे संपर्क साधावा, असे अकादमीच्या सचिवांनी कळवले आहे.