Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात वैशाली माडे व एन. राजेश यांनी केले मंत्रमुग्ध
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

यवतमाळातील पर्व महिला बचत गट व युनिव्हर्सल हय़ुमन राईट्स असोसिएशन यांच्या संयुक्त

 

विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळातील समता मैदानावर नुकताच सारेगमपची महागायिका वैशाली माडे व एन. राजेश यांच्या स्वरांनी सजलेला कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात एन. राजेश यांनी ‘भारतीय घटनेचा तु शिल्पकार आहे..’ या दिवं. सुरेश भट यांच्या गीताने केली. यानंतर वैशाली माडे यांनी ‘ज्ञानसुर्य तू इस जगत का भिमराव महान..’ हे गीत गावून रसिकांना मंत्रमुग्ध केले. बेबी धनर्षी, वर्षां बुरबुरे, चेतना नायडू, विशाल नाहाटकर आदींनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. गायकांना पंकज सिंग, भूपेश सवाई (सिंथेसायझर), मनोज विश्वकर्मा, प्रवीण लिहितकर (गिटार), विकास बोरकर (तबला), विषू पसेरकर, मिन्टू गबरील (पॅड), वैभव बुरबुरे (कोंगो) यांनी साथ दिली. ध्वनीमुद्रण संदीप बारस्कर यांचे होते. दीपक माढे व शहीद यांनी उद्घोषकाची जबाबदारी सांभाळली. युनिव्हर्सल हय़ूमन राईट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सर्वाचे आभार मानले. या कार्यक्रमाला सुमारे २० हजार रसिक उपस्थित होते.