Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डिफेन्स सेवकांच्या पतसंस्थेतर्फे गुणवंत पाल्यांचा सत्कार
नागपूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी

डिफेन्स प्रोजेक्ट सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्यावतीने समाज सदन हॉल येथे सकाळी १० वाजता संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी

 

सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रकाश सोनटक्के व प्रमुख पाहुणे म्हणून ओआयटीसी ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे पी. मिश्रा, अतिरिक्त महाव्यवस्थापक एस.के. जाफरी, डी.व्ही. सोनपिपरे, संयुक्त महाव्यवस्थापक आय.एम. साखरे, व्ही.पी. मुंघाटे, जी.के. चौधरी, उपमहाव्यवस्थापक निरंजन उपस्थित होते.
याप्रसंगी नैसर्गिक मृत्यू विमा योजनेंतर्गत दोन मृत सभासदांच्या वारसदारांना धनादेश वितरित करण्यात आले. तसेच, विद्यार्थीदिनानिमित्त दहावी व बारावीच्या परिक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या सभासदांच्या पाल्यांना ५०१ रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
संस्था राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल जाफरी यांनी संचालक मंडळाचे कौतुक केले. अपघात मृत्यू विमा योजना व नैसर्गिक मृत्यू विमा योजना संस्थेने सुरू केल्यामुळे भागधारकांच्या वारसदारांना जो लाभ मिळतो त्याबाबतही त्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनटक्के यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक आर.एस. वंजारी यांनी केले. सहसचिव आर.व्ही. गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले.