Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

‘गुरु’ महिमा की ‘कीर्ति’?
उत्तर पश्चिम मुंबई

समर खडस

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सगळ्यात चांगला मतदारसंघ असल्याचे बोलले जात होते. पुर्वीच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विभाजन होऊन मुंबई उत्तर मध्य व मुंबई उत्तर पश्चिम असे दोन लोकसभा मतदारसंघ तयार झाले. यातील उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त उभ्या आहेत. तर उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीíतकर, काँग्रेसचे गुरुदास कामत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शालिनी ठाकरे हे उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. गुरुदास कामत यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. उत्तर पश्चिममध्ये अबू आझमी यांनी तीन महिन्यांपूर्वीपासूनच प्रचार सुरू केला. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन ही जागा सरळ शिवसेनेच्या पारडय़ात जाणार, असा सगळ्याच राजकीय जाणकारांचा होरा होता. मात्र गुरुदास कामत या शिवसेनेच्या स्टाईलमध्येच ‘ठसन’ देणाऱ्या उमेदवाराला इथे उतरवल्यामुळे चित्र आता बदलले आहे. उमेदवारी अर्जाच्या तपासणीमध्येच कीर्तिकरांच्या अर्जातील तांत्रिक चूक शोधून शिवसेनेच्या गोटात घबराट पसरवून कामतांनी गाठ माझ्याशी आहे, हे दाखवून दिले आहे. मात्र जवळपास १६ लाखांच्या या मतदारसंघात साडेपाच लाख संख्या असलेल्या अस्सल मराठी मतदारांमुळे शिवसेनेचा आत्मविश्वास अद्यापही टिकून आहे.

कच्चे दुवे शोधण्यासाठी भाजपची शक्ती पणाला!
विक्रम हरकरे

मध्य प्रदेशात येत्या ३० एप्रिलला लोकसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा होत असून मोरेना, दमोह, गुना, ग्वाल्हेर, सागर, राजगढ, उज्जन, रतलाम, देवास, धार, खरगोन, मंदासौर, इंदोर, टिकमगढ, भिंड आणि खंडवा या १६ मतदारसंघात मतदान होईल. राज्यात पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघात फक्त ४७ टक्के मतदान झाल्याने प्रमुख राजकीय पक्षांना धक्का बसला. यंदाचा उन्हाळा तापमानाचे नवे विक्रम नोंदवत असल्याने कडक उन्हात मतदानाला बाहेर पडण्यापेक्षा लोकांनी घरी बसणेच पसंत केले. परिणामी राज्यात ५० टक्केसुद्धा मतदान झालेले नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे महिला मतदारांचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा होता.परंतु, तरुण मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला; भाजपचे काय ?
शिवराज पाटील यांचा सवाल

मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामे दिले होते. संसदेवरील हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा दिला नव्हता की अन्य कोणत्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे नैतिकतेचा मुद्दा मांडण्याचा भाजपला अधिकार नसल्याचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आज सांगितले.

पवारांच्या रोड शोने सुटला ठाकरेंच्या सभेचा गुंता
ठाणे, २५ एप्रिल/ प्रतिनिधी

ठाण्यातील तिरंगी लढत चुरशीची दिसू लागली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाहीर सभेऐवजी रोड शोच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार असल्याने, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभेला सेंट्रल मैदान उपलब्ध झाले आहे. या सभेची परवानगी देतानासुद्धा पोलिसांनी ठाकरे यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करीत आडकाठी आणण्याचा केलेला प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजप आता बरिस्ता-कॉफी हाऊसमध्ये!
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी

तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आता कॉफी हाऊस, बरिस्ता आणि आयनॉक्ससारख्या तरूणांचा राबता असणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांना मतदान करण्याविषयी आणि चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याविषयीचे धडे देणार आहे. याशिवाय रेडियो चॅनल्स, जागो रे, इंटरनेट, फेसबुक, ऑर्कुट, लोकल केबल चॅनल, एसएमएस या माध्यमांचाही त्यासाठी उपयोग करण्यात येत आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या आणि महाविद्यालयीन तरूणांना मतदानविषयी जागृत करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या, २६ एप्रिल रोजी सायंकाळी गिरगाव येथे युवा रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या युवा नेता शायना एन सी यांनी आज दिली.

तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेसाठी
पुरेशा जागा मिळणार नाहीत- पवार
नवी दिल्ली २५ एप्रिल/पीटीआय
तिसऱ्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळतील व सरकार स्थापन करण्यासाठी प्रसंगी काँग्रेसचा पाठिंबा घेऊ, या माकप सरचिटणीस प्रकाश करात यांच्या वक्तव्यावार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी साशंकता व्यक्त केली असून तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेसाठी पुरेशा जागा मिळणार नाहीत, असे त्यांनी आज एका मुलाखतीत सांगितले.

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह विधान, संजय राऊत यांच्यावर गुन्हा
ठाणे,२५ एप्रिल /प्रतिनिधी

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतप्त झालेल्या शिख समुदायाने आज वर्तकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली.

प्रलोभन हेच मतदानाच्या टक्केवारीस मारक
नाशिक, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

ग्रामपंचायत असो की पंचायत समिती यासह गावपातळीवरील अन्य लहानलहान निवडणुकांमध्ये मतदारांना विविध पक्षांच्या उमेदवारांकरवी विकासाचे आश्वासन मिळण्याऐवजी थेट अर्थपूर्ण प्रलोभने दाखविली जावू लागल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राजकीय फायद्यासाठी मराठीचा वापर - पवार
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

राजकीय फायद्यासाठीच भाषेच्या आधारे मुंबईत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष आज हल्ला चढविला.

बाळासाहेब वगळता बाकीच्यांचे मराठी प्रेम सोयीनुसार -राज
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य सेनानेत्यांचे मराठी प्रेम हे सोयीनुसारचे आहे, अशी घाणाघाती टीका करून मी जेव्हा मराठीचे आंदोलन केले तेव्हा संसदेत शिवसेनेचे खासदार गप्प का बसले, असा सवाल राज ठाकरे यांनी अंधेरी येथे केला. मुंबईत तुमची ताकद दाखवा, असे आवाहन लालूप्रसाद यादव करीत आहेत. एकत्र छटपूजा करून एकजूट दाखविण्याची हिंमत ते करीत आहेत, असे सांगून राज म्हणाले, की आज जर आपण गाफील राहिलो तर मुंबई कायमची मराठी माणसांच्या हातून जाईल.

रावलेंचा विजय कुणीही रोखू शकणार नाही - जोशी
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी

गिरणगावचे सुपुत्र असलेल्या शिवसेनेच्या मोहन रावलेंवर गिरणी कामगारांनी सातत्याने विश्वास दाखवला. हा विश्वास सार्थ ठरवताना रावले यांनी लोकसभेत सातत्याने गिरणी कामगारांसाठी आवाज उठवला.

बीडमध्ये पाच मतदानकेंद्रांवर उद्या फेरमतदान
मुंबई, २५ एप्रिल / खास प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हे निवडणूक लढवित असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर येत्या सोमवारी फेरमतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.