Leading International Marathi News Daily

रविवार , २६ एप्रिल २००९

महाबळेश्वरचे मराठी साहित्य संमेलन पार पडून आता महिना होत आला आहे. त्यानिमित्ताने उडालेली धूळ केव्हाच खाली बसली आहे. नव्हे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुसरीच धूळ उडण्यास प्रारंभही झाला आहे. पण अजूनही संमेलनानिमित्ताने जे घडले, वृत्तपत्रांनी घडवले ते आपल्या व महामंडळाच्या बदनामीकरणाचे षडयंत्र होते, त्यात असभ्यपणाची व असंस्कृतपणाची वृत्ती होती, प्रसारमाध्यमांची विकृत मानसिकता होती, अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी घेतली आहे. ती भूमिका विषद करणारे हे त्यांचे निवेदन. म हाबळेश्वर येथे पार पडलेले ८२ वे मराठी साहित्य संमेलन आता संपले. खरोखरच या संमेलनात काय घडले? कसे घडले व घडत गेले? जे घडले त्याला मी व महामंडळ खरोखर जबाबदार आहोत का? असलो तर किती प्रमाणात जबाबदार आहोत? प्रसार माध्यमांनी दाखविले व लिहिले ते किती खरे व किती वस्तुनिष्ठ आहे, हे लोकांसमोर यावे म्हणून आरंभापासून संमेलन संपेपर्यंत घटनाक्रम मांडून वास्तव काय आहे, ते सांगण्याच्या हेतूने हा लेखनप्रपंच करीत आहे.

पाकिस्तानमधील लाहोर शहरामध्ये गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी दोन भीषण हल्ले चढविले. त्यापैकी गेल्या ३० मार्च रोजी लाहोरच्या पोलीस अ‍ॅकॅडमीवर चढविण्यात आलेल्या हल्ल्यादरम्यान, सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीत काही पोलिसांसह चार दहशतवादी ठार झाले तर सहा दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले. पाकिस्तान व जगभरात वाढलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांचे मूळ हे पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील घडामोडीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणविषयक नव्या धोरणासंदर्भात उत्तम सहकार्य द्यावे यासाठी इराण, पाकिस्तान, रशिया, भारत यांसारख्या देशांशी चर्चा करण्याची नामी संधी नेदरलँडस् येथे नुकत्याच पार पडलेल्या परिषदेच्या निमित्ताने नाटो व अमेरिकेच्या मित्र देशांना मिळाली होती. ‘‘अल काईदा व तालिबानींना जाणीवपूर्वक नव्हे तर केवळ नैराश्येपोटी साथ देणाऱ्या लोकांना या शक्तींपासून विलग करण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने चालविलेल्या प्रयत्नांना आपण सर्वानी मनापासून साथ द्यायला हवी’’ असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी हेग येथील परिषदेत केले होते.

संगीतकार शंकर जयकिशन यांच्या ‘बरसात’ या पहिल्या चित्रपटाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. पहिल्याच चित्रपटातून यशस्वी झालेल्या या जोडीनं पुढल्या अडीच दशकांच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केलं. त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी जागविणारा हा लेख स्व. शंकर यांच्या आजच्या बाविसाव्या स्मृतिदिनानिमित्त-
ख रं तर राज कपूरची पहिली निर्मिती होती ‘आग.’ (१९४८) पण अनेकांना ‘बरसात’ हाच ‘आर. के.’ बॅनरचा पहिला चित्रपट वाटतो, याचं कारण त्या चित्रपटाला मिळालेलं धुवाधार यश. साठ वर्षांपूर्वी तयार झालेल्या या दोन चित्रपटांमध्ये निर्माता - दिग्दर्शक म्हणून राज कपूरच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन कंगोरे स्पष्टपणे दिसतात. ‘आग’मध्ये होता वेगळं काही करण्याचा ध्यास घेतलेला, उत्कटतेची आस असलेला राज तर ‘बरसात’मध्ये दिसला सर्वसामान्य प्रेक्षकांची पकड घेणारा, त्यांना हलक्याफुलक्या कथानकात आणि सुमधूर संगीतात गुंगवून सोडणारा व्यवसायचतुर राज.

ए. आर. रेहमानच्या ‘जय हो’ने ऑस्कर पुरस्कार मिळवून बाजी मारली आणि आम्हा भारतीयांनी आनंदाचा परमोच्च बिंदू गाठला. हा पुरस्कार म्हणजे हिंदी फिल्मसंगीताच्या इतिहासात एक मैलाचा दगड म्हणून अभिमानाने मिरवत राहील. अर्थात ‘जय हो’च्या यशाच्या मागे रेहमानची असामान्य कारकिर्द ताकदीने उभी होती यात शंकाच नाही. स्लमडॉगच्या यशाच्या निमित्ताने रेहमानच्या चतुरस्र कामगिरीचा अनेक ठिकाणी आढावा घेण्यात आला त्यात प्रामुख्यानं हे जाणवलं की रहमान कोणत्यातरी एका टाइपमध्ये जास्त काळ अडकला नाही. केवळ भारतीय शास्त्रीय संगीताचाच त्याने सढळ वापर केला नाही तर त्याबरोबर पाश्चिमात्य म्हणा वा विदेशी संगीतातही तो तेवढाच रमला. त्याने या प्रकारच्या संगीताला कधी नावही ठेवली नाहीत. अशावेळी आमच्या पिढीच्या संगीतसम्राटाचे अर्थात शंकरजींचे (शंकर-जयकिशन) शब्द आजही आठवतात.