Leading International Marathi News Daily
रविवार, २६ एप्रिल २००९

महत्त्वाची प्रकरणे मार्गी लागतील
राशिस्थानी सूर्य, सोमवारी अक्षय्य तृतीया, शुक्रवारी अकरावा येत असलेला गुरू आणि शनी- राहूचे सहकार्य आहेच. याच ग्रहकाळात प्रगतीचा वेग वाढतो. महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतात. नवीन उपक्रमांचा अचूक शोध घेता येतो. व्ययस्थानी शुक्र- मंगळ असेपर्यंत ठरवलेल्या खर्चाचे अंदाज मात्र चुकतात. बुध-नेपच्यून केंद्रयोगामुळे शब्दकृतीचा समन्वय अवघड ठरतो. तरीही निर्धाराने पुढे सरकत राहा. भक्तिमार्ग प्रसन्नता देणारी शक्ती आहे.
दिनांक : २६ ते ३० शुभकाळ
महिलांना : गुरुकृपेने प्रपंच आणि प्राप्ती यातून प्रसन्नता मिळत राहील.

कर्तृत्व उजळेल
भाग्यांत राहू, दशमांत गुरूचा प्रवेश होत आहे. लाभात शुक्र-मंगळ सहयोग आणि राशिस्थानी बुध नेत्रदीपक यशाने कर्तृत्व उजळून काढणारी ग्रहस्थिती आहे. असाल त्या क्षेत्रात याची कमी-अधिक प्रचीती वृषभ व्यक्तींना येत राहील. व्यापारी समस्या सुटतील. समाजकार्यात जम बसवता येईल. बौद्धिक वर्तुळांत प्रभाव वाढेल. कलाक्षेत्रात चमकाल. मंगलकार्याचा खटाटोप कारणी लागेल. चतुर्थातला शनी मिळकतीच्या प्रकरणात मात्र तणाव निर्माण करणारा आहे. स्पर्धा नको.
दिनांक : २८ ते १ शुभकाळ
महिलांना : कार्यप्रांतात सार्थकी प्रयत्नांचा आनंद लाभेल.

प्रभाव वाढेल, सतर्क राहा
दशमात शुक्र, मंगळ; लाभात सूर्य, पराक्रमी शनी आणि गुरूची भाग्यस्थानाकडे सुरू असलेली वाटचाल मिथुन व्यक्तींच्या प्रयत्नात विश्वास निर्माण होईल. आणि अचूक कृतीमुळे अनेक प्रांतांत प्रभाव प्रस्थापित करता येईल. अक्षय्य तृतीया अभिनव उपक्रमांचा प्रारंभ करणारी ठरावी. रविवारच्या बुध-नेपच्यून केंद्रयोगाने शनिवापर्यंतच्या उत्कर्ष प्रवासात फसवणूक होऊ नये, यासाठी सतर्क राहणे मात्र आवश्यक ठरेल. मंगलकार्य ठरेल. जागेचा प्रश्न सुटेल.
दिनांक : २९ ते २ शुभकाळ
महिलांना : अवघड समस्या सुटतील, नवीन क्षेत्रात यश मिळेल.

साहस करू नका
साडेसाती, अष्टमात येत असलेला गुरू यांच्यातून नव्या समस्यांची निर्मिती होण्याचा संभव आहे. निश्चित निष्कर्षांला येईपर्यंत कोणतीही महत्त्वाची कृती करण्याची घाई करू नका. भाग्यात शुक्र- मंगळ प्रयत्नातील उत्साह कमी होऊ देणार नाही. दशमातील रवी प्रतिष्ठा मजबूत ठेवणार आहे. लाभातील बुध समस्यांमधून बाहेर पडण्याच्या कल्पनांचा पुरवठा करीत असतो. अक्षय्य तृतीया अभिनव कार्याचा श्रीगणेशा करण्यास उपयुक्त आहे. तरीही साहस कटाक्षाने टाळा. संभ्रमात सापडू नका.
दिनांक : २७, २७, १, २ शुभकाळ.
महिलांना : कष्टाने प्रश्न सोडवावे लागतील. प्रयत्न करत राहा.

गुरू राश्यांतरातून लाभ
साडेसाती, अनिष्ट राहू, अष्टमात शुक्र-मंगळ व्यवहारांमुळे अडचणी दूर करीत करीतच पुढे सरकावे लागणार आहे. भाग्यांत सूर्य, दशमात बुध यांच्या आधाराने नियमित उपक्रम सुरू ठेवा. शुक्रवारी गुरूचे राश्यांतर होईल आणि अचानक नवा प्रकाश दिसू लागेल. त्यातून जबाबदाऱ्या पूर्ण करणारा उत्साह मिळेल. अक्षय्य तृतीया संपर्ककृती यातून आनंद देणारी आहे. शुभ चंद्रभ्रमणामुळे लाभांश कमी राहील, पण माघारीचे प्रसंग टाळता येतील.
दिनांक : २७ ते ३० येथे त्याची प्रचीती येईल.
महिलांना : अपेक्षित यशासाठी थांबावे लागेल. सबुरीने कृती करा.

यश अवघड होईल
साडेसाती, गुरूचा असहकार सुरू होईल. अष्टमात रवी आहे. कन्या व्यक्तींच्या समोर छोटी- मोठी नवी आव्हाने उभी राहतील. त्यातून व्यवहारातील सोपे यश अवघड होत राहणं शक्य आहे. रविवारी बुध-नेपच्यून केंद्रयोग होत असल्याने आश्वासनांवर विश्वासून कृती करता येणार नाही. तरीही शुक्र-मंगळ राहू साथ देतील आणि प्रतिष्ठेला संरक्षण देता येईल, एवढी सफलता मिळवू शकाल. निराश न होता प्रयत्न करत राहा. अक्षय्य तृतीया नवीन कार्याचा श्रीगणेशा करण्यास शुभ आहे.
दिनांक : २७ ते १ प्रतिष्ठा सांभाळता येईल.
महिलांना : रागरंग पाहून कृती करा, यश मिळेल. प्रयत्न सोडू नका.

समस्या सुटू लागतील
लाभांत शनी, सप्तमात सूर्य आणि शुक्रवारी गुरू पंचमात प्रवेश करील. तूळ व्यक्तींच्या समस्या वेगाने सुटू लागतील. त्यातून काही कृती आणि प्रवासाचा मार्ग निश्चित करू लागाल. अचूक अंदाजासाठी थोडा अवधी जावा लागेल; परंतु अक्षय्य तृतीयेपासून प्रगतीची काही शुभ चिन्हं दृष्टिपथात येऊ लागतील. धर्मकार्येही आनंद देतील. षष्ठांत शुक्र-मंगळ, चतुर्थात राहू, अष्टमात बुध यांच्यामुळे धावपळ, ओढाताण असले प्रकार सुरू राहिले तरी निराश न होता पुढे सरकत राहा.
दिनांक : २९ ते २ शुभकाळ.
महिलांना : नव्या आशा पल्लवित होतील, प्रयत्नाने यश मिळवाल.

चित्र आकर्षक होईल
पंचमात शुक्र, मग सप्तमात बुध, दशमात पराक्रमी राहू यामधील प्रतिक्रियेने वृश्चिक व्यक्तींना प्रगतीचं चित्र, नव्या कल्पना, अभिनव उपक्रम आणि परिश्रम यातून आकर्षक वाटचाल करता येईल. चतुर्थात येत असलेल्या गुरूची सध्या तरी चिंता नको; परंतु बुध- नेपच्यून केंद्रयोगाने संधी आणि सफलता यांचे दुवे दुर्बल करू नयेत, यासाठी सावध राहणे आवश्यक राहील. प्रवास कराल. चर्चा भेटी उपयुक्त ठरतील. व्यवसायाची गाडी रुळावर आणता येईल, मंगलकार्य ठरावे.
दिनांक : २७, २८, १, २ शुभकाळ.
महिलांना : मनाजोगत्या गोष्टी घडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील.

उत्साही घटनांचा काळ
पराक्रमी येत असलेला गुरू आणि भाग्यात शनी, मीन राशीत शुक्र, मंगळ याच ग्रहस्थितीमुळे धनू व्यक्तींना निर्णय घेऊन कृती करणं सोपं होईल आणि प्रयत्नाने यशही व्यापक करू शकाल. अक्षय्य तृतीयेला नवीन प्रयोगांचा आरंभ, नवा उत्साह देणारा ठरेल. बढती बदलीचे योग येतील. मंगलकार्ये ठरतील. व्यवसायातील भागीदारीच्या समस्या सुटतील. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करू शकाल. बुध-नेपच्यून केंद्रयोगाने प्रलोभने आणि मृगजळ यांच्यापासून सावध राहावे लागेल.
दिनांक : २६, २९, ३० शुभकाळ.
महिलांना :समाज व्यासपीठ गाजवाल.

आगेकूच सुरू राहील
राशिस्थानी राहू, पराक्रमी शुक्र, मंगळ पंचमात, बुध आणि कुंभ राशीत प्रवेशणारा गुरू नव्या नव्या क्षेत्रातील मकर व्यक्तींची आगेकूच सुरू होईल, त्यातून प्रतिमा उजळून काढण्याएवढं यश मिळेल आणि बडीबडी मंडळी आपल्या बैठकीत बसू लागतील. मोठमोठय़ा क्षेत्रात जम बसवता येईल. त्यात राजकारण, कलासाहित्य, व्यापार यांचा समावेश राहील. अष्टमात शनी असेपर्यंत शत्रूंवर लक्ष ठेवावे लागते. बुध-नेपच्यून केंद्रयोगात आश्वासन, कागदपत्र यात सावध राहाणे आवश्यक असते.
दिनांक : २७, २८, १, २ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नपूर्वक व निर्धाराने पुढे चला यश मिळेल.

परिवर्तनाचा काळ
पराक्रमी सूर्य, प्रसन्न शुक्र, मंगळाचा प्रतिसाद आणि शुक्रवारी राशिस्थानी येत असलेला गुरू, हालचालींचा वेग, यशाची व्याप्ती, प्रतिष्ठेची उंची यामध्ये याच काळात मोठे परिवर्तन होईल, त्यातून कार्यप्रांतात शक्तीकेंद्रच बनून जाल. अक्षय्य तृतीया नवीन कार्यक्रमांना अविस्मरणीय यश देणारी ठरावी. व्यापाराची गाडी रुळावर येईल. प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. प्रवास होतील. नवे अधिकार हाती येतील. दर्जेदार परिचितांचा नवा परिवार तयार होईल. व्ययस्थानचा राहू धार्मिक तपश्चर्या कारणी लावील.
दिनांक : २६, २९, ३० शुभकाळ.
महिलांना : नेत्रदीपक यश देणारा ग्रहकाळ आहे.

चक्र वेगाने फिरवता येईल
राशिस्थानी शुक्र, मंगळ-मेष, सूर्य पराक्रमी, बुध लाभात, राहू यातून मीन व्यक्तींना संधी साधता येतील. प्रतिष्ठा सांभाळता येईल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील आणि नवीन उपक्रमांची रूपरेखा तयार करू शकाल. शनीची अनिष्टता शुक्रवारच्या गुरू राश्यांतरापासून वाढणारी असली, तरी याच सप्ताहातील काही संधी भविष्यातील संरक्षणासाठी उपयोगात आणता येतील. संयम, शिस्त, प्रार्थना यातून कार्यचक्र अधिक वेगाने फिरवता येऊ शकेल. प्रवास होतील. शुभकार्ये ठरतील. नोकरीचा प्रश्न सुटेल.
दिनांक : २७, २८, १, २, शुभकाळ.
महिलांना : कार्यक्रम यशस्वी ठरतील, प्रभाव वाढेल.