Leading International Marathi News Daily
सोमवार , २७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वसंत डावखरेंची तीन मतदार याद्यांमध्ये नावे
युतीची तक्रार
कल्याण, २६ एप्रिल/प्रतिनिधी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे नाव मतदार यादीत तीन ठिकाणी आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १७ नुसार हे कृत्य

 

बेकायदेशीर असल्याने डावखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी मागणी युतीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
परांजपे यांनी तक्रार करताना पुणे येथील रहिवासी शाम देशपांडे यांच्या डावखरेंसंदर्भात केलेल्या तक्रारपत्राचा आधार घेतला आहे. उमेदवार परांजपे यांनी निवेदनात म्हटले आहे, शाम देशपांडे यांच्या तक्रारीनुसार वसंत डावखरे यांचे नाव कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक ८९, अनु. क्र. १५९ अन्वये नोंदविण्यात आले आहे. याचवेळी डावखरे यांचे नाव ठाणे विधानसभा मतदारसंघातही भाग क्र. १३३, अनु. क्र. ६७ व भाग क्र. २८०, अनु. क्र. ७९१ असे ठाण्यात दोन ठिकाणी नोंदविण्यात आले आहे.
डावखरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की, अशा प्रकारची यादीत नावे असू शकतात. ती कमी करणे हे स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात असते. हे प्रकरण फार गंभीर नाही.